भाजप गटनेत्यांचे ‘वरातीमागून घोडे’

उड्डाणपुलाला विरोध : प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करण्याचा इशारा
mayor satish kulkarni
mayor satish kulkarnisakal
Updated on

नाशिक : मायको सर्कल व सिडकोतील त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलावरून (fly over)गेल्या दोन महिन्यांपासून वादाची अनेक उड्डाणे होत असताना, आता भाजपचे महापालिकेतील गटनेते अरुण पवार यांना पुलाला चुकीच्या पद्धतीने मंजुरी दिल्याचा साक्षात्कार झाला असून, श्री. पवार यांच्या या वरातीमागून घोड्याच्या प्रवासामुळे भाजपमध्ये आतापर्यंत शमलेला पुलाचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. पवार यांनी विरोधाचे पत्र सादर करत महासभेने (meeting in nashik carporation)चुकीच्या पद्धतीने ठराव केल्याचा आरोप केला. ठरावावरील स्वाक्षरी पक्षाच्या ध्येयधोरणांची पायमल्ली असल्याचे सांगताना महापौर सतीश कुलकर्णी (mayor satish kulkarni)यांच्यावर निशाणा साधला. खुलासा न झाल्यास पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याचा इशारा दिला.(bjp nashik)

mayor satish kulkarni
विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकचे काम सुसाट

मायको सर्कल व त्रिमूर्ती चौकातील अडीचशे कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाचे काम प्रारंभापासून वादात सापडले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यानंतर पुलाच्या सिमेंट प्रतवारीचा मुद्दा समोर आला. तब्बल ४४ कोटी रुपये जादा अदा करण्याचा वाद झाला. पुलाच्या वादात अनेक जण पडले व तेवढ्याच गतीने संशयास्पद बाहेर पडले. मात्र, आरोपांचा सिलसिला कमी होताना दिसत नाही. सभागृहनेते कमलेश बोडके यांनी विरोधाचे पत्र दिल्यानंतर आता गटनेते अरुण पवार यांनी पुलाच्या वादात उडी घेतली आहे. उड्डाणपुलाचा ठराव जादा विषयात मंजूर केल्याने संशय व्यक्त करताना या ठरावावर सूचक व अनुमोदक म्हणून अन्य सदस्यांच्या घेतलेल्या सह्या पक्षाच्या ध्येयधोरणानुसार नाहीत. सभागृहनेता व गटनेत्यांना स्वाक्षरीचा अधिकार असताना, ठराव मान्य कसा केला, असा सवाल पवार यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

mayor satish kulkarni
नागपूर विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकचे काम सुसाट

महापौरांनी मंजूर ठरावाचा खुलासा करावा

महापौर कुलकर्णी(mayor satish kulkarni) यांनी उड्डाणपुलाच्या मंजूर ठरावाबाबत खुलासा न केल्यास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chndrkant patil) यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा श्री. पवार यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.