चांदवड/ वडनेरभैरव (जि. नाशिक) : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शिवरे गावात पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
याठिकाणी एका विधवा महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी तोंडाला काळ फासून गळ्यात चपलांचा हार घालत गावातून धिंड काढली. आपल्या पतीने आत्महत्या केली नसून त्याचा घातपात झाल्याचा संशय या महिलेने व्यक्त केला आहे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. (In laws blackened widow daughter in law face march drawn in village at shivre village chandwad Nashik Crime News)
राजर्षी शाहू महाराजांनी देशाला पुरोगामी महाराष्ट्राचा संदेश दिला. त्याच महाराष्ट्रातील नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शिवरे गावात पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
एका महिलेला सासरच्या लोकांनी तिच्या तोंडाला काळे फासत गळ्यात चपलांचा हार घालून गावात धिंड काढली. दहा दिवसांपूर्वी या महिलेच्या पतीने गळफास लावून आत्महत्या केली होती.
मात्र, आपल्या पतीने आत्महत्या केली नसून त्यांचा घातपात झाला आहे, असा संशय या महिलेने दशक्रिया विधीच्या दिवशी उपस्थित केला. महिला पतीच्या दशक्रिया विधीसाठी आल्यानंतर तीच्या वरील त्यांचा राग अनावर झाला.
याच कारणावरून या महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी तोंड काळ करून चपलाचा हार घालत गावात तिची धिंड काढली. असा परस्पराविरोधी आरोपातून हा घटनाक्रम घडला असून प्रशासकिय पातळीवर याची दखल घेतली गेली आहे. नाशिक जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक स्वतः या ठिकाणी जाऊन आढावा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल
दरम्यान महिलेच्या पतीच्या आत्महत्या प्रकरणी सासूच्या तक्रारीवरून वडनेरभैरव पोलिसांनी संशयित म्हणून श्रावण गांगुर्डे वय 35 रा.शिवरे ता चांदवड यास अटक केली असून सद्या हा संशयित न्यायालयीन कोठडीत आहे.
दरम्यान वडनेर भैरव पोलिसांनी नंदा अनिल कोते या विधवेच्या फिर्यादीवरून सासरच्या तेरा महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही महिला दशक्रिया नातेवाईकांसोबत गेली असता सासरच्यांनी तीच्या गळ्यात छापलाचा हार घालून शीवरे गावाच्या गल्लीबोळातून तोंडाला काळे फासून दिंडी काढली, म्हणून वैशाली रवींद्र खानझोडे, अनिता भाऊराव सताळे, कल्पना पंडित गवळी, मीराबाई चींधू सातळे, पुनम खंडू सताळे, ज्योती बाळू मोरे,मिरी जगन मोरे, मनीषा विष्णू गांगुर्डे, मंगल विष्णू पवार, मीराबाई भाऊसाहेब गांगुर्डे,सुनंदा नंदू सताळे रा. शिवरे ता.चांदवड मीना गजाराम पूर्ण नाव माहित नाही रा.वागुळदा, ता.दिंडोरी अशा बाई घोगर रा. नांदगाव यांच्यावर 355,323,143,147,149,504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.