...अन् बैलगाडीतून नववधूला आणले माहेरातून सासरला

Bullock cart
Bullock cartesakal
Updated on

पांढुर्ली (जि. नाशिक) : 'गाडी घुंगराची आली पवार घराण्याची...लेक लाडकी आईबापाची निघाली सासरी... माहेरच्या आठवणी... निमित्त होते लग्नाच्या पहिल्या मुळाचे. पांढुर्ली गावातील पवार परिवारातील सदस्य व मित्रांनी लग्नाच्या पहिल्या मुळासाठी चक्क बैलगाडीतून (Bullock cart) नववधूला माहेरातून सासरला आणले. अन् जुनी कालबाह्य झालेली परंपरा (Expired tradition) जोपासली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक (Appreciation) होत आहे.

Bullock cart
One Month complete Rohit & Julie's wedding: रोहित - जुईलीची क्यूटवाली मॉर्निंग | Sakal Media |

पांढुर्ली गावातील शेतकरी कुटुंबातील सखाराम मुकुंदराव पवार यांचे चिरंजीव अनिकेत व उल्हास निव्रुती वाजे यांची कन्या कोमल यांचा विवाह (Wedding) नुकताच झाला. लग्नानंतर माहेराहून पहिल्या मुळासाठी गेलेल्या नववधूला आणण्यासाठी पवार परिवारातील सदस्य व मित्रांनी दोन बैलगाड्या सजविल्या. या बैलगाड्या थेट वाजे परिवाराच्या वस्तीवर मराठमोळ्या वातावरणात आल्या. चक्क पहिल्या परतमुळासाठी बैलगाड्या बघून शेतकरी कुटुंबातील वाजे परिवारालाही आनंद झाला. पाहुणचार (Hospitality) व सत्कार समारंभ आटोपून नववधू कोमलला बैलगाडीत बसवून सासरच्या घरी आणण्यात आले. कालमानाप्रमाणे बदलत चाललेली जुनी परंपरा (Old tradition) पवार परिवाराने जपली असल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती.

Bullock cart
Vikrant Sheetal Wedding: आपलीच हळद, म्हणून एवढं नाचायचं?

या अनोख्या उपक्रमात पांढुर्ली गावचे सरपंच पंढरीनाथ ढोकणे, विकास सेवा संस्थेचे माजी चेअरमन छगनराव पवार, निव्रुती वाजे, ज्येष्ठ ग्रामस्थ कुंडलीक पवार, पंढरीनाथ पवार, बाळासाहेब पवार, सामाजिक कार्यकर्ते संतोष वालझाडे, दत्तात्रय वाजे, सखाराम पवार, पोपटराव पवार, गंगाराम पवार, बाळासाहेब मोगले, शंकरराव केदार, उल्हास वाजे, अरुण वाजे, विष्णू वाजे, संतोष पवार, गोकुळ वाजे, शिवाजी वाजे, खंडू वाजे, संजीव वाजे आदींसह वाजे कुटुंबातील महिला सहभागी झाल्या होत्या.

Bullock cart
Farhan akhtar wedding: फरहान अख्तरच्या लग्नाचे फोटो व्हायरल

"पवार कुटुंबातील सदस्य व मित्रांनी बैलगाडीतुन सुनेला आणण्यासाठी अनोखा उपक्रम राबविला असुन हे कौतुकास्पद आहे. यामुळे जुन्या परंपरा जपून पंचक्रोशीत आदर्श निर्माण केला आहे." - पंढरीनाथ ढोकणे,सरपंच, पांढुर्ली

"बैलगाडीतून नववधूचे पहिले मुळ करण्याचा प्रस्ताव पवार कुटुंबातील सदस्यांनी प्रत्यक्षात कृतीतून उतरविला. माझ्यासह बाळासाहेब मोगले, दत्तात्रय पाटील वाजे, शंकरराव केदार यांनी प्रयत्न केले." - संतोष वालझाडे,सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.