दहा रुपये द्या आणि हेल्मेट घ्या! काही तरुणांकडून युक्ती

दहा रुपये द्या आणि हेल्मेट घ्या! काही तरुणांकडून युक्ती
Updated on
Summary

काहींना रोजगार जरी मिळाला असला, तरी हा प्रकार विविध प्रकारच्या आजारांना निमंत्रण देणारा ठरणार आहे.

जुने नाशिक (नाशिक): 'दहा रुपये द्या आणि हेल्मेट घ्या, पेट्रोल भरल्यानंतर परत करा' असा प्रकार सध्या काही पेट्रोलपंपाच्या बाहेर बघण्यास मिळत आहे. त्यामुळे काहींना रोजगार जरी मिळाला असला, तरी हा प्रकार विविध प्रकारच्या आजारांना निमंत्रण देणारा ठरणार आहे.

दहा रुपये द्या आणि हेल्मेट घ्या! काही तरुणांकडून युक्ती
अखेर पोलिसांना जाग आली! जुने नाशिक परिसरात नायलॉन मांजाचा शोध 

दुचाकीचा वापर करणाऱ्या शहरातील नागरिकांना हेल्मेट वापरण्याची सवय लागावी. यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्याकडून 'नो हेल्मेट, नो पेट्रोल' उपक्रम राबविला जात आहे. तरीदेखील काही नागरिकांकडून हेल्मेटचा वापर केला जात नाही. पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या अशा नागरिकांची मोठी पंचाईत होत आहे. थोड्या वेळापुरता अन्य दुचाकी चालकाकडून हेल्मेट मागून पेट्रोल भरले जात आहे. प्रत्येक वेळा असे करणे शक्य नाही. हे लक्षात घेता काही तरुणांनी चांगली युक्ती लढवली आहे. दोन ते तीन हेल्मेटची खरेदी करून ते हेल्मेट काही पेट्रोलपंपाच्या बाहेर आडोशाला ठेवण्यात आले आहे.

दहा रुपये द्या आणि हेल्मेट घ्या! काही तरुणांकडून युक्ती
दादरचे ७० वर्षांपासूनचे जुने हनुमान मंदिर हटवण्यासाठी मध्य रेल्वेची नोटीस

पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडे हेल्मेट नाही अशा व्यक्तीस दहा रुपये भाडे आकारून त्यास पेट्रोल भरण्यापुरते हेल्मेट दिले जाते. पेट्रोल भरून झाल्यानंतर तो दुचाकीचालक पुन्हा त्या तरुणास हेल्मेट परत करून देतो. दिवसभरात अनेक व्यक्ती अशा प्रकारे हेल्मेट भाड्यावर घेऊन पेट्रोल भरताना दिसत आहे. द्वारका, वडाळा रोडवरील पेट्रोलपंपाच्या बाहेर असे प्रकार सुरू असल्याची माहिती दुचाकी चालकाकडून देण्यात आली. असे करणाऱ्या तरुणांना रोजगार मिळाल्याचा अनुभव जरी येत असला, तरीदेखील त्यांच्याकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे. हे तेवढेच खरे आहे.

दहा रुपये द्या आणि हेल्मेट घ्या! काही तरुणांकडून युक्ती
"या' मॉडेलचे चप्पल, जुने कपडे खरेदी करण्यासाठी उत्सुक असतात चाहते!

आजारास निमंत्रण

दिवसभरात दुचाकी चालक हेल्मेटचा वापर करत आहे. त्यातील काहींना आरोग्याच्या समस्यादेखील असू शकतात. असे असताना एकच हेल्मेट कित्येक जणांकडून वापरले जात आहे. त्यातून आजारास निमंत्रण मिळत आहे. सध्या कोरोना संसर्ग झपाट्याने होत आहे, त्यास पूरक असे वातावरण या प्रकारामुळे उपलब्ध होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.