येणाऱ्या काळात शहरवासीयांना अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे.
नाशिक : नववर्षाच्या स्वागताचा(new year ) आनंद नाशिककरांचा औटघटकेचा ठरत आहे. २०२१ ला निरोप देताना आगामी वर्ष तरी आरोग्यदायी जावो, अशा शुभेच्छा अनेकांनी आप्तस्वकीयांना दिल्या असतील. मात्र, नववर्षात कोरोना प्रादूर्भाव(corona update nashik) बघता, प्रत्यक्ष परिस्थिती पूर्णपणे विपरित झाली आहे. गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांपैकी तब्बल ७७ टक्के बाधित नाशिक महापालिका (nashik carporation)क्षेत्रातील आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात शहरवासीयांना अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे.
शनिवार (ता. ८)पर्यंत नववर्षातील गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यात तीन हजार ७६३ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. या संख्येत आणखी मोठी भर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, आठ दिवसांत आढळलेल्या बाधितांपैकी तब्बल दोन हजार ८९७ बाधित नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. जिल्ह्यात आढळलेल्या एकूण बाधितांपैकी हे प्रमाण तब्बल ७७ टक्के आहे, तर नाशिक ग्रामीण क्षेत्रात ६७४, मालेगाव महापालिका क्षेत्रात २८ बाधित आढळून आले आहेत. दुसरीकडे कोरोनामुक्त रुग्णांचा विचार केल्यास जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत ७७९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यापैकी ५१३ कोरोनामुक्त नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. नाशिक ग्रामीणमधील १८८, मालेगावच्या नऊ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मृतांची संख्या सध्या नियंत्रणात
बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना, मृतांची संख्या नियंत्रणात आहे. किमान ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. आठ दिवसांत जिल्ह्यात सात बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यापैकी चार मृत नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. नाशिक ग्रामीणमधील तीन बाधितांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मालेगावला आठ दिवसांत एकाही बाधिताचा मृत्यू झाला नसल्याची नोंद आहे.
उपचार घेणारे ७७ टक्के बाधितही शहरातील
नव्याने आढळणाऱ्या बाधितांप्रमाणे जिल्ह्यातील सक्रिय कोरोनाबाधितांपैकी नाशिक शहरातील बाधितांचे प्रमाण ७७ टक्के आहे. गेल्या ३१ डिसेंबरला नाशिक शहरातील ३५८ बाधितांवर उपचार सुरू होता. मात्र, शनिवार (ता. ८)पर्यंत हा आकडा दोन हजार ७३८ वर पोहोचला आहे. ग्रामीण भागात वर्षाअखेर १९५, तर मालेगावला आठ बाधितांवर उपचार सुरू होते. मात्र, शनिवारपर्यंत नाशिक ग्रामीणमधील सक्रिय बाधितांची संख्या ६७८, तर मालेगावची २७ वर पोहोचली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.