ग्रामीण भागात लाकडी अवजारे नामशेष

पावसाळ्यापूर्वी लोखंडी अवजारे बनविताना कारागिर
पावसाळ्यापूर्वी लोखंडी अवजारे बनविताना कारागिरesakal
Updated on

नरकोळ (जि. नाशिक) : ग्रामीण भागात पूर्वी बैलांच्या सहाय्याने शेतीची सगळी कामे करावी लागायची. त्यासाठी शेतकऱ्यांकडे लाकडापासून बनवलेली अवजारे असायची. त्यामुळे पेरणीपूर्वी अवजाराची दुरुस्ती कामे करण्यासाठी सुतार व्यवसाय करणाऱ्यांकडे सकाळपासून शेतकऱ्यांची गर्दी होत. त्यामुळे सुतार व्यावसायिकांना यासाठी वर्षाची बोलणी करुन घ्यावी लागायची. कालांतराने पारंपारिक पद्धतीने शेती करणे थांबवून आता शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करायला लागला. त्यामुळे शेतीत वापरात येणारे लाकडी अवजारे इतिहासजमा होत आहेत.

अलिकडच्या काही वर्षापासून लाकडी नांगर, वखर, पांभर (तिफन) कोळपे, बैलगाडी आदी अवजारे काळ्या मातीतून काढता पाय घेऊ लागली आहे. पारंपरिक पद्धतीने होणारी शेती आता मागे पडायला लागली. शेती कामासाठी लागणाऱ्या सर्वच लाकडी अवजारांची वाढती किंमत, दुरुस्तीचा खर्च आवाक्‍याबाहेर जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने शेतीची कामे होऊ लागली. शेतकऱ्यांचा वेळही वाया जात नाही. शेतीतील कामे वेळेवर होत आहेत. नाहीतर एक एकर शेती नांगरणी करण्यासाठी सात ते आठ दिवस लागायचे. तेच काम आज तासाभरात होत आहे.

आजही ग्रामीण भागात लोखंडी अवजाराची विक्री वाढली. लोखंडी अवजारे बनविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ट्रॅक्टर अवजारेही विक्री होऊ लागली. त्यामुळे जुनी लाकडी अवजारे मागे पडल्याने व्यावसायिक चिंताग्रस्त बनले. परंतु, त्यांनी विवाह समारंभातील पलंग, दिवानीसह देव्हारा, डायनिंग टेबल, खुर्ची या हस्तकलेच्या वस्तूत मन रमल्याने हा व्यवसाय तेजीत आहे.

विरगावची लाकडी बैलगाडी आठवणीत

पूर्वी लाकडी बैलगाडीला विशेष महत्व होते. ‘शेती तेथे बैलगाडी’ होती. बैलगाडी शेतात खत टाकण्यासह बाजरी, गहू शेतातून कापणीनंतर वाहतुकीस उपयोगी पडत. विरगावला ही बैलगाडी मिळत. येथील कारागिर याबाबतीत अग्रेसर होते. म्हणून आजही लाकडी बैलगाडी म्हटली की विरगावची आठवण येते.

"शेतीसाठी लाकडी अवजारे नामशेष झाल्याने आता लोखंडी अवजाराशिवाय पर्याय नाही. पावसापूर्वी मशागतीसाठी दरवर्षी अवजारांची विक्री होते. लोखंडी अवजारे दुरूस्तीची कामे वर्षभर सुरू राहतात."

- गंगाधर बोरसे, यशवंत वेल्डिंग, विरगाव, ता. बागलाण

पावसाळ्यापूर्वी लोखंडी अवजारे बनविताना कारागिर
Summer Holiday : उन्हाळी सुट्टीमुळे पर्यटनाला चालना

असे आहेत लोखंडी अवजाराचे दर

अवजाराचे मागील दर - आताचे दर

बैलगाडी ४१,००० - ३८,०००

नांगर ४३०० - ३८००

वखर ३५०० - ३२००

पांभर ४५०० - ४१००

बैल सारयंत्र ३८० - ३५००

कोळपण २२०० - १९००

ट्रॅक्टर नांगर ३१०० - २७,०००

ट्रॅक्टर केरण २१०० - १८,०००

ट्रॅक्टर सारयंत्र २८०० - २८,०००

पावसाळ्यापूर्वी लोखंडी अवजारे बनविताना कारागिर
Nashik : 'अनाथाचे नाथ' बनले कळमदरी गाव!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.