Sakal Exclusive : पहिल्या दिवसापासुनच कमी होणार दप्तराचे ओझे

student school
student schoolesakal
Updated on

Nashik News : शिक्षण व शैक्षणिक साहित्याचे सार्वत्रिकीकरण होणे, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे, पाठ्यपुस्तके व वह्यांच्या वजनाने दप्तराचे ओझे वाढणे, त्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणाम या सर्व मुद्यांचा विचार करून येत्या शैक्षणिक वर्षापासुन पाठ्यपुस्तकातच वह्यांची पाने जोडून वाटप करण्यात येणार आहेत.

यामुळे शाळेच्या पहिल्या दिवसापासुनच दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होणार आहे. (In textbooks one to two blank pages will be included as per requirement after recitation poems nashik news )

राज्य पाठ्यपुस्तक मंडळातर्फे तयार करण्यात येणाऱ्या सर्व माध्यमांच्या व सर्व विषयांच्या पाठ्यपुस्तकांत पाठ, कवितांनंतर आवश्यकतेनुसार एक ते दोन पाने समाविष्ट करण्यात येणार आहेत. शासनाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेली चार भागांतील पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून पथदर्शी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व पाठ्यपुस्तकांसाठी ही योजना लागू असेल. यात प्रत्येक घटक, पाठ, कविता यांच्या शेवटी वहीची एक ते दोन पृष्ठे जोडण्यात येतील. त्यावर वर्गात शिकविले जात असताना विद्यार्थ्यांनी महत्त्वाच्या नोंदी, शब्दार्थ, महत्त्वाचे सूत्र, संबोधन, वाक्ये, टिपणं आदींची नोंद करणे अपेक्षित आहे.

यामध्ये श्रुतलेखन, शुद्धलेखन नोंदविणे अपेक्षित नाही. यावरून वर्ग कार्याचा स्तर कसा आहे, हेदेखील समजू शकेल. आवश्यक तेथे या संदर्भाने सुधारणा होण्यासाठी सूचनाही करता येतील. तसेच, पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेल्या प्रश्‍नांव्यतिरिक्त सराव, वर्गकार्य, गृहपाठ आदींसाठी वेगळ्या वह्या ठेवण्यास मुभा देण्यात येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

student school
Sakal Exclusive : रेशनकार्डचे डिजिटायझेशन; ऑनलाइन डाउनलोड करता येणार; लाभार्थ्यांना मिळणार आता ई-शिधापत्रिका

या आहेत सूचना

* इयत्ता १ लीची पाठ्यपुस्तकेही एकूण ४ भागांमध्ये तयार करून, त्यात आवश्यकतेनुसार सरावासाठी पृष्ठ समाविष्ट करण्यात येणार आहेत.

* खासगी आणि विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना नियमित पाठ्यपुस्तके मिळणार आहेत.

* विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांत अनिवार्य विषयांची विभागणी करता यावी. परंतु, श्रेणी तसेच वैकल्पिक विषयांची पुस्तके स्वतंत्ररित्या उपलब्ध करुन देण्यात यावीत.

* कागदाच्या दरात झालेल्या वाढीमुळे पाठ्यपुस्तकांच्या किंमतीवर परिणाम होणार आहे.

* महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडून वाढीव किंमतीची प्रतिपूर्ती करण्यात येईल.

* योजनेची यशस्विता लक्षात घेऊन पुढील वर्षापासून योजना पुढे सुरू ठेवण्यात येणार आहे.

student school
NMC News : शहरात 21 हजार व्यापारी रडारवर; एलबीटी निर्धारण करण्याच्या सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.