तिसऱ्या लाटेत परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते - खासदार भारती पवार

कोविड परिस्थितीबाबतच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या
Bharati Pawar
Bharati PawarGoogle
Updated on

सुरगाणा (जि. नाशिक) : अजूनही डोळे उघडा, मोकाट फिरु नका; तिसरी लाट आली तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असा इशारा खासदार डॉ. भारती पवार (MP Dr Bharati Pawar) यांनी दिला. येथील पंचायत समिती सभागृहात कोविड (Covid) परिस्थितीबाबतच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. (In the third wave of Corona the situation may get out of hand says MP Bharti Pawar)

गावनिहाय माहिती गोळा करण्याच्या सूचना

सध्या कोरोना संक्रमण हे भयानक स्थितीत जाऊन पोहोचले आहे. सगळीकडे चिंताजनक परिस्थिती आहे. यावर आरोग्य यंत्रणेनेकडून काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याबाबत खासदार पवार यांनी माहिती घेतली. या वेळी त्यांनी अनेक सूचना केल्या. लोक लस घेण्यास घाबरत आहेत. लसीकरणाबाबत अनेक गैरसमज निर्माण केले आहेत. जनतेचे मतपरिवर्तन कसे करता येईल, या करीता गावातील शिक्षक, पोलिस पाटील, आशाताई, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य तसेच, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी लस घेतली का, याची गावनिहाय माहिती संकलन करा, ज्यांनी गावात लस घेतली त्यांनाच प्रबोधन करण्यास सांगा, कोणाचा तरी जीव वाचला पाहिजे, लस घेतल्याने कोणीही दगावले नाही, असे ठामपणे सांगा, प्रत्येक गावात कोणी लस घेतली याची गावनिहाय माहिती गोळा करण्याच्या सूचना खासदार पवार यांनी दिल्या.

Bharati Pawar
नाशिकमध्ये ‘टॉसिलिझुब’ इंजेक्शनचा काळा बाजार! फार्मसीचे 2 विद्यार्थी ताब्यात

जिल्हा परिषद सदस्य रतन चौधरी यांनी पिंपळसोंड येथील सिमावर्ती गावातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात गुजरातमधून पांगारणे येथे जावे लागते. त्यांना प्रवेश दिला जात नाही. नागरिकांकडून कोविड चाचणी अहवाल मागितला जातो, अशी कैफियत मांडली. त्यावर खासदार पवार यांनी पिंपळसोंड येथे अॅन्टीजन टेस्ट करण्याचे आदेश दिले.

याप्रसंगी तहसीलदार किशोर मराठे, सभापती मनीषा महाले, उपसभापती इंद्रजित गावित, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे, जि. प. सदस्या ज्योती जाधव, विस्तार अधिकारी रामचंद्र झिरवाळ, काशीनाथ गायकवाड, पंचायत समिती सदस्या एन. डी. गावित, विठ्ठल गावित, रतन चौधरी, वसंत भोये, गणेश पाटील, सचिन महाले, दिनकर पिंगळे, राजेंद्र निकुळे, मनोहर जाधव आदी उपस्थित होते.

पुरेसे बेडची व्यवस्था करण्याचे निर्देश...

कागदी घोडे नाचवणे बंद करा, इथे माणसं मरत आहे. प्रत्यक्ष काम झाले पाहिजे. लस घेण्याकरीता वातावरण निर्मिती करावी, मोठ्या गावात लसीकरणाचे कॅम्प ठेवावेत, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यासाठी पुरेशा बेडची व्यवस्था करण्याचे निर्देश खासदार पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

Bharati Pawar
Positive Story : मशिदीतून मिळणार प्राणवायू! गरजूंना वेळीच मिळणार ऑक्सिजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()