Nashik Wedding Tradition : गाव करील ते राव काय करील! येथे आहे लग्नसोहळ्याची अनोखी पद्धत...

Panchamandi while collecting money for marriage
Panchamandi while collecting money for marriage esakal
Updated on

Nashik Wedding Tradition : लग्नामध्ये सर्व मानपान पूर्ण करताना वधू पित्याला मोठा खर्च येतो. त्यामुळे कधी कधी आर्थिक परिस्थिती नसताना देखील त्याला उसने, कर्ज घेऊन लग्न करावे लागतो.

ते कर्ज फेडण्यासाठी त्याला अधिक कामही करण्याची वेळ येते. (in this village wedding is done by unique way nashik news)

अशी वेळ पूर्ण आदिवासी वस्ती असलेल्या सरवर गावातील कोणत्याच मुलीच्या घरच्यांवर येऊ नये म्हणून येथील तरुणांनी एकत्रित येत गावातील कोणत्याही कुटुंबातील मुलामुलींच्या लग्नाकरीता प्रत्येकी हजार रुपये लोकवर्गणी जमा करून आपल्या समाजबांधवाचा संसार उभा करण्यासाठी तन मन धनाने हातभार लावण्याची आगळीवेगळी प्रथा सुरू केली आहे.

गाव करील ते राव काय करणार या म्हणीची प्रचिती बागलाण तालुक्यातील संपूर्ण आदिवासी वस्ती असलेल्या सरवर गावात येत असून गावातील प्रत्येक कुटुंबातील लग्नसोहळ्यासाठी लोकवर्गणी करून सर्व लहान थोर एकत्र येऊन धुमधडाक्यात लग्न समारंभ पार पाडत आहेत. एकीकडे त्यांनी निर्माण केलेल्या नविन आदर्श व एकजुटीची परिसरात चर्चा रंगली आहे.

लग्न जुळल्यानंतर आठ दिवसांत गावातील सर्वच कुटुंब प्रमुख आपली वर्गणी गोळा करून वर-वधू पित्याकडे ती सुपूर्द केली जाते. मुलाचे लग्न असल्यास वधू पक्षाला ठराविक रक्कम दिली जाते. त्याबाबत प्रत्येक गावानुसार रक्कम ठरविली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Panchamandi while collecting money for marriage
Nashik Wedding Gift : लग्नापेक्षा होत होती आहेराचीच चर्चा! मित्राच्या मुलीला दिला 'हा' अनोखा आहेर...

उर्वरित रक्कमेतून बस्ता, मंडप, वऱ्हाडींचे जेवण, संसारोपयोगी वस्तू व इतर आवश्यक खर्च केला जातो.

लग्नाच्या दिवशी गावातील सर्व घटक एकत्र येऊन समाजाच्या विवाहासंबंधी नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करीत मंडप बांधणे, सजावट, स्वंयपाक करणे, वऱ्हाडींना पंगतीत जेवण वाढणे वरातीत सहभाग घेऊन धुमधडाक्यात लग्न समारंभात साजरे करतात.

वधूमुल्य देऊन विवाह

आदिवासी समाजात वधू मूल्य देऊन विवाह केले जातात. वधू प्राप्त करण्यासाठी वधू पित्याला पैसा धान्य या स्वरूपात वधू मूल्य देण्याची प्रथा आहे. त्याला पेंढी असे म्हणतात. खर्चात पडणाऱ्या वधू कुटुंबाला हातभार लावण्याच्या हेतूने ही मदत केली जाते. कसमादे पट्ट्यात प्रत्येक गावात पेंढीची रक्कम पंचवीस हजार ते पन्नास हजारांपर्यंत ठरवलेली आहे.

Panchamandi while collecting money for marriage
Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा; स्वत: शिंदेंनीच सांगितलं विठूरायाकडं काय मागितलं..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.