नाशिकच्या गावांमध्ये लसीकरणाला मुंबई-पुण्यातील लोकांच्या रांगा

एकाचवेळी ज्येष्ठांचा दुसरा डोस आणि तरुणांसाठीच्या दोन डोससाठी कोट्यवधी डोस आणायचे कुठून? हा कळीचा मुद्दा पुढे आला
Corona Vaccine
Corona VaccineGoogle file photo
Updated on

नाशिक : राज्यात शासनाने ४४ वयोगटावरील नागरिकांसाठी लसीकरण (vaccination) सुरू केले आहे. ज्येष्ठांच्या लसीकरणाचा पहिला डोस अपूर्ण असताना त्यांना दुसरा डोस मिळेनासा झाला आहे. त्यातच लसटंचाईच्या (Vaccine Shortage) परिस्थितीतच केंद्र शासनाने थेट १८ वर्षांच्या तरुणांच्या लसीकरणाची घोषणा केली. त्यामुळे एकाचवेळी ज्येष्ठांचा दुसरा डोस आणि तरुणांसाठीच्या दोन डोससाठी कोट्यवधी डोस आणायचे कुठून? हा कळीचा मुद्दा पुढे आला. (In villages of Nashik for corona vaccination People from Mumbai Pune are coming)

लस आणि आकड्यांचा खेळ

राज्यात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. राज्यात ४५ वर्षांवरील सुमारे तीन कोटी लस देण्याचे नियोजन आहे. तीन कोटी नागरिकांना प्रत्येकी दोन डोस द्यावे लागणार आहेत. आतापर्यंत एक कोटी नागरिकांना लसचा पहिला डोस दिला गेला आहे. तर दोन कोटी लोकांना पहिला डोस देणे बाकी आहे. पहिल्या डोस दिल्यानंतर ४५ दिवसांनी दुसरा डोस द्यायचा आहे. मात्र अद्याप पहिल्या डोसपैकी दोन कोटी नागरिकांना डोस देणे बाकी असतानाच या तीन कोटी नागरिकांना दुसरा डोस द्यावा लागणार आहे. म्हणजेच ४५ वर्षांवरील ज्येष्ठांसाठी एकूण पाच कोटी डोस लागणार आहेत. ज्येष्ठांच्या पाच कोटी डोसची केंद्र शासनाकडून सोय झालेली नसतानाच गेल्या १ मेपासून केंद्र शासनाने राज्यांना १८ ते ४४ वर्षांच्या तरुणाईच्या लसीकरणाचे आदेश दिले आहेत.

Corona Vaccine
वेस्‍ट नाही; पण कोरोनाचे लसीकरण बेस्‍टही नाहीच!

…तर एकरकमी धनादेश

विशेष म्हणजे १८ वर्षांवरील तरुणांना लस देण्याच्या व त्यांची सोय राज्यांनीच करावी, अशा केंद्र शासनाच्या सूचना आहेत. राज्य शासन एकरकमी पैसे देण्यास तयार आहे. मात्र एवढ्या लसी मिळणार कुठे? हा प्रश्न आहे. तरुणांच्या लसीकरणाचा भार राज्य शासनाने उचलावा, अशी केंद्र शासनाची भूमिका आहे. राज्य शासनही त्यासाठी तयार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १८ वर्षांवरील तरुणांच्या लसीकरणासाठी लागणारा खर्चाचा एकरकमी धनादेश देण्यास तयार आहे. पण लसींचा तुटवडा असेल, तर राज्याला लस मिळणार कुठून? असे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे म्हणणे आहे. एकूण काय तर केंद्राच्या नियोजनाच्या पाच कोटी आणि साधारण तितक्याच राज्याच्या नियोजनाच्या पाच कोटी अशा दहा कोटी लसी उपलब्ध होणार कुठून? हा कळीचा मुद्दा आहे.

लसीकरणातील जिल्ह्यातील अडचणी

- मुंबई, पुण्यातील नागरिक नाशिकमध्ये

- ऑनलाइन नोंदणीत स्लॉटचा प्रश्‍न गंभीर

- ग्रामस्थांना त्यांच्या गावात लस मिळण्यास अडचण

- गावोगावच्या केंद्रांवर शहरी नागरिकांच्या रांगा

- ऑनलाइन नोंदणीत ग्रामस्थांच्या मर्यादा

(In villages of Nashik for corona vaccination People from Mumbai Pune are coming)

Corona Vaccine
नाशिककर सुधरेनात! 18 हजार बेशिस्तांकडून सव्वा कोटी दंड वसूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.