Nashik News : हनुमंतपाडा- खोरीफाटा, तसेच हस्ते ते सापूतारा रस्ता या दरम्यान उनंदा नदी व मांजरपाडा कालव्यावर आठ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर दोन पुलांचे काम पूर्णत्वास आले असून, रविवारी (ता. २५) या पुलांचे लोकार्पण करण्यात आले. (Inauguration of Bridges on Unanda River and Manjarpada Canal After waiting for almost 8 years Nashik News)
मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पांतर्गत पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी बोगद्याद्वारे उनंदा नदीत सोडण्यात आले आहे. साधारणत: २००९पासून हनुमंतपाडा- खोरी रस्त्यावरील उनंदा नदीत सिमेंटचे चार-पाच पाईप व त्यावर भराव टाकून तात्पुरता रस्ता उपलब्ध करुन दिला होता.
मात्र, पाच ते सहा वर्षांपासून पावसाळ्यात उनंदा नदीला पूर आल्यास दोन्ही बाजुंचा संपर्क तुटत असे. मागील तीन वर्षांपासून मांजरपाडा प्रकल्पातील पाणीही बोगद्यातून नदी पात्रात सोडले जावु लागल्याने या रस्त्यावरील मोरी व भराव वाहून गेले.
त्यामुळे, परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमाल, खते आदींच्या वाहतूकीसाठी व येण्या-जाण्यासाठी हस्तेदुमाला, पिंप्री मार्गाने पाच ते सहा किलोमीटरचा फेरा मारुन प्रवास करावा लागत असे. ज्यांच्याकडे वाहाने नाहीत असे रहिवासी व शेतमजुर शेतीच्या कामांसाठी जाताना जीव मुठीत धरुन नदी ओलांडत असत.
याबाबत हस्तेदुमाला येथील नामदेव राऊत, सरपंच रामदास गायकवाड, उपसरपंच वंदना पाटील आदींनी लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधींना वेळोवेळी निवदने देवून आंदोलनाचा इशाराही दिला होता.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व अधिकाऱ्यांनी यात लक्ष घातल्यानंतर चौसाळे ते हस्तेदुमाला दरम्यान तीन पुल, दोन बंधारे बांधण्याच्या कामास १ लाख ७० लाखांचा निधी मिळाला. त्यातून ही कामे पूर्णत्वास गेली आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दरम्यान, मविप्रचे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रविण जाधव, ज्येष्ठ नागरिक मार्तंड पाटील, प्रा. आर. एल. पाटील यांच्या हस्ते दोन्ही पुलांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत सभागृहात मार्तंड पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला.
प्रकाश पिंगळ, संतोष रेहरे, विद्युत मंडळाचे अभियंता राऊत, पृथ्वी सोनवणे, जुबेर शेख, बंटी सोनवणे, दत्तात्रय राऊत, गुलाब जाधव, मोतीराम तुंगार, ललीता खांडवी, दिलीपराव शिंदे, विश्वासराव देशमुख, आर. एल. पाटील, दशरथ महाले, केशव भोये, चेतन राऊत आदी या वेळी उपस्थित होते.
सरपंच रामदास गायकवाड, उपसरपंच वदंना पाटील, ग्रामपंचायत सदस्य अरूण चौधरी, एकनाथ गांगोडे, मंगला कडाळे, गुलाब जाधव, केशव राऊत, मुरलीधर ठाकरे, हिरामण कडाळे, योगेश महाले, रघुनाथ महाले आदींसह जेष्ठ नागरिकांनी स्वागत केले. नामदेव राऊत यांनी प्रास्ताविक केले. ग्रामसेविका सौ. ए. बी. बनोटे यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब पाटील यांनी आभार मानले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.