Goda Mahotsav : गोदा महोत्सवाचे मंगळवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

महोत्सवाचे उद्‌घाटन मंगळवारी (ता. ६) सकाळी अकराला पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होणार आहे.
Goda Mahotsav
Goda Mahotsav esakal
Updated on

Goda Mahotsav : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा- उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद यांच्यामार्फत ५ ते ७ फेब्रुवारीदरम्यान विभागीय मिनी सरस व जिल्हास्तरीय स्वयंसहाय्यता समूहांची उत्पादने विक्री व प्रदर्शन २०२३-२४ गोदा महोत्सवाचे आयोजन गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह येथे करण्यात आले आहे.

महोत्सवाचे उद्‌घाटन मंगळवारी (ता. ६) सकाळी अकराला पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होणार आहे. (Inauguration of Goda Mahotsav on Tuesday by Guardian Minister dada bhuse nashik news)

या वेळी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

Goda Mahotsav
Namami Goda: ‘नमामि गोदा’ प्रकल्प अडीच हजार कोटींच्या पार; सल्लागार संस्थेकडून आयुक्तांना प्रारूप आराखडा सादर

ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू व खाद्य पदार्थांचे भव्य प्रदर्शन शासनामार्फत केले जाते. ५ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत दररोज सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत महिलांनी उत्पादित केलेल्या विविध आकर्षक अशा वस्तू व चविष्ट खाद्य पदार्थ नाशिककरांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी दिली.

ग्रामीण भागातील गरीब महिलांच्या उद्योगास व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी गोदा महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, प्रकल्प संचालक संगमनेरे यांनी केले आहे.

Goda Mahotsav
Namami Goda Project : सिंहस्थाच्या पार्श्‍वभूमीवर ‘नमामि गोदा’ प्रकल्पाचे फेरसर्वेक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.