आशा, गटप्रवर्तकांना एक हजारांचा दरमहा प्रोत्साहन भत्ता

aasha workers
aasha workersesakal
Updated on

नाशिक : जिल्हातील सर्व आशासेविका व गटप्रवर्तक यांना कोरोना कामासाठी ग्रामपंचायततर्फे दरमहा एक हजार रुपयांचा प्रोत्साहान भत्ता लागू करण्याचा निर्णय नाशिक जिल्हा परिषदने घेतला आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना तसे पत्र दिले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील तीन हजार ७०० आशा व ३०० गटप्रवर्तक यांना फायदा होणार आहे. या निणर्याबद्दल बनसोड यांचा आयटक सलग्न आशा व गटप्रवर्तक संघटनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. (Incentive-allowance-to-aasha-workers-nashik-marathi-news)

जिल्हा परिषदेचा निर्णय

जिल्ह्यात कामा करणाऱ्या आशा व गटप्रवर्तक या आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी लढा देत होत्या. मागण्याची दखल घेतली जात नसल्याने आशासेविका व गटप्रवर्तक यांनी सात दिवस बेमुदत संपदेखील केला होता. या संपाची दखल शासनाने घेत त्यांच्या मानधनात वाढ केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आशा व गटप्रवर्तक यांना ग्रामपंचायततर्फे एक हजार रुपये प्रोत्साहान भत्ता देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. तसे पत्रदेखील बनसोड यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना दिले. या वेळी राज्याध्यक्ष राजू देसले, ज्योती गोडसे, अरुणा आव्हाड, मंगल गोडसे, अश्विनी डेंगळे आदी उपस्थित होत्या. याप्रसंगी संघटनेतर्फे जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ. कपिल आहेर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांचेही आभार मानले.

aasha workers
आंतरजातीय विवाहितांना सामाजिक न्यायाचे बळ
aasha workers
घराच्या किंमती वाढणार? सामान्यांच्या खिशाला लागणार कात्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.