Nashik News : बाह्यवळण रस्त्यासाठी ‘इन्सेंटिव्ह टीडीआर’; NMCचा शासनाकडे प्रस्ताव

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal
Updated on

Nashik News : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेकडून पाथर्डी ते आडगाव या दरम्यान ६० मीटर रुंदीचा बाह्यवळण व आडगाव ते गरवारे चौक यादरम्यान ३६ मीटर लांबीचा रिंगरोड तयार करण्याचे नियोजन केले आहे.

या संदर्भातला प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला असून, भूसंपादनाच्या बदल्यात इन्सेंटिव्ह टीडीआर दिला जाणार आहे. राज्य शासनाने प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर भूसंपादन संदर्भात नवीन धोरण महापालिका अमलात आणणार आहे. (Incentive TDR for Bypass Road NMC proposal to Govt Nashik News)

२०२६-२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी महापालिकेने आतापासून नियोजन केले असून, राज्य शासनानेदेखील सिंहस्थ कुंभमेळा आराखडा तयार करण्याच्या सूचना महापालिकेला दिला आहे.

त्याअनुषंगाने पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठक घेत संयुक्त विकास आराखडा तयार करणाऱ्या समितीला सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने शहरातील वाढत्या वाहतुकीवर पर्याय म्हणून रिंगरोड तयार करण्याची नियोजन करण्यात आले आहे.

पाथर्डी ते आडगाव असा ६० मीटर रुंदीचा बाह्य रिंगरोड व आडगाव ते गरवारे पॉइंट यादरम्यान ३६ मीटर लांबीचा रिंगरोड तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

रिंगरोडसाठी भूसंपादन महत्त्वाचे ठरणार असून, भूसंपादनाचा मोबदला देताना जमीन मालकांना इन्सेंटिव्ह टीडीआर देण्याचा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाला सादर केला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

NMC Nashik News
Nashik News : आदिवासी विभागात प्रतिनियुक्तीवरून अधिकाऱ्यांमध्ये पेटला वाद

सव्वा चार हजार कोटींचे भूसंपादन

आगामी कुंभमेळ्यासाठी साधूग्राम तसेच रिंगरोडसाठी जवळपास सव्वाचार हजार कोटी रुपये लागणार आहे. यात सर्वात मोठा भाग भूसंपादनाचा आहे. या संदर्भात महापालिकेने प्रस्ताव सादर केला असून, राज्य शासनाला सादर केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने महापालिकेने प्रस्ताव सादर केला.

मात्र जवळपास चार महिने उलटले तरीही शासनाकडून भूसंपादनासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. दरम्यान, या संदर्भात राज्य शासनाला महापालिका विनंती पत्र पाठविले जाणार आहे.

NMC Nashik News
Nashik News : दिंडोरी तहसील इमारतीसाठी जागा न देण्यासाठी ‘कृषी’च्या प्रधान सचिवांना पत्र!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.