Nashik News: महापालिकेचा सुवर्ण जयंती योजनेत समावेश करा; आमदार ढिकले यांची विधानसभेत मागणी

Rahul Dhikale
Rahul Dhikaleesakal
Updated on

Nashik News : शहराची वाढती लोकसंख्येच्या अनुशंगाने किकवी धरणाला मान्यता देण्याबरोबरच चौदा हजार पदांचा महापालिकेचा आकृतिबंध मंजरू करावा, तसेच ‘क’ व ‘ड’ महापालिकांच्या धर्तीवर विशेष बाब म्हणून महापालिकेचा नागरी सुवर्ण जयंती पुनरुत्थान योजनेंतर्गत समावेश करावा, अशी मागणी आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी विधानसभेत केली. (Include Municipal Corporation in Golden Jubilee Scheme MLA Dhikle demand in assembly Nashik News)

Summary

आमदार ढिकले यांनी आज शहरातील विविध समस्या विधानसभेत मांडल्या. त्यात वाढत्या लोकसंख्येच्या अनुशंगाने शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी किकवी धरणाची आवशक्यता असल्याचे नमूद केले.

त्याचबरोबर नाशिक महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्याने शासनाने ‘क’ व ‘ड’ वर्ग महापालिकांच्या विकासासाठी नागरी सुवर्ण जयंती पुनरुत्थान योजना अमलात आणली आहे. विशेष बाब म्हणून योजनेत नाशिक महापालिकेचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली.

महापालिकेची स्थापना झाली त्या वेळी जवळपास सात हजार पदांचा आकृतिबंध मंजूर करण्यात आला होता. परंतु आता शहराची लोकसंख्या पंचवीस लाखांपर्यंत पोचत असल्याने जुन्या आकृतिबंधानुसार कामकाज सुरू आहे.

त्याचा परिणाम कर्मचाऱ्यावर अतिरिक्त कामाचा बोजा पडून नियमित कामकाजावर परिणाम होत असल्याने तातडीने शासनाकडे प्रलंबित असलेला चौदा हजार पदांचा आकृतिबंध मंजूर करण्याची मागणी विधानसभेत करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rahul Dhikale
NMC News: दीड महिन्यात मंजूर फायलींची यादी करा तयार; आयुक्त करंजकर यांच्या प्रशासनाला सूचना

आमदार ढिकले यांनी केलेल्या मागण्या

- सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी युद्धपातळीवर नियोजन करावे

- पेठ रोड सिमेंट काँक्रिटीकरणासाठी विशेष निधी द्यावा

- शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेसाठी निधी द्यावा

- पुण्याच्या धर्तीवर बाह्य व अंतर्गत रिंगरोडसाठी निधीची तरतूद

- महापालिकेचा १४ हजार पदांचा आकृतिबंध मंजूर करावा

- महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती द्यावी

- वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी किकवी धरण बांधावे

- दारणा धरणातून थेट पाइपलाइन करावी व अमृत २ योजनेत समावेश करावा

- मलनिस्सारण व्यवस्था सुधारण्यासाठी ५४५ कोटी निधी द्यावा

- कोठारी नाट्यगृहासाठी निधी द्यावा

- विशेष बाब म्हणून महापालिकेचा नागरी सुवर्ण जयंती पुनरुत्थान योजनेत समावेश करावा

Rahul Dhikale
Armory Exhibition: सह्याद्री प्रतिष्ठानच्या पुण्यातील शस्त्रागार प्रदर्शनात विंचूरकरांचे ‘शाही फर्मान'!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.