Nashik Crime News : शहरात महिला अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. त्यात दोन घटनांत अतिप्रसंगाचे, तर एका प्रकरणात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, यातील एका घटनेच्या संशयितांमध्ये एका विद्यार्थी नेत्याचा समावेश असल्याचे समजते. (Increase in cases of rape against women in city 2 counts of aggravated assault one molestation Nashik Crime News)
पेठरोड वरील म्हसोबावाडीत राहणाऱ्या एका गतीमंद पिडीतेवर राजू चारोस्कर (वय ५०, रा. म्हसोबावाडी) याने वेळोवेळी अत्याचार केला. गेल्या आठ महिन्यांपासून तो हे कृत्य करीत होता. त्यामुळे मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला असून, पसार झालेल्या संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत.
याच भागातील एका अन्य घटनेत निलम स्विट भागात सतिष उर्फ पिंटू भिकुनाथ गुप्ता (वय ३८, रा. शिवशक्ती अपार्टमेंट, कर्णनगर) याने पिडीतेच्या घरी जावून बेकायदा पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने संशयिताने पिडीतेस शिवीगाळ व दमदाटी करीत विनयभंग केला.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
या दोन्ही घटनांबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, तिसरी घटना महात्मानगर भागात घडली. यात, विद्यार्थी नेता असलेल्या किरण बाळासाहेब फडोळ (वय ३३, रा. मुंगसरा ता. नाशिक) याने व्यवसायासाठी पिडीतेची जागा भाडेतत्वावर घेतली होती.
१५ मार्चला थकित भाड्याची रक्कम देत असल्याचे सांगून त्याने महिलेस महात्मानगर येथील एका हॉटेलवर बोलावून कॉफीमधून गुंगीचे औषध देत अत्याचार केल्याचे, तसेच या वेळी काढलेले अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकीही संशयिताने दिल्याचे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.