Nashik News : रेल्वेच्या देशांतर्गत मालवाहतुकीत वाढ! 6 हजार 542 किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण

railway
railwayesakal
Updated on

नाशिक : भारतीय रेल्वेने २०२२-२३ मध्ये एक हजार ५१२ मेट्रिक टन मालवाहतूक केली. २०२१-२२ मध्ये एक हजार ४१८ मेट्रिक टनाची मालवाहतूक केली होती. त्या तुलनेत ही वाढ ६.६३ टक्के आहे. शिवाय महसुलामध्ये २७.७५ टक्क्यांनी वाढ होऊन, दोन लाख ४४ हजार कोटी रुपये महसूल मिळाला. (Increase in domestic freight of railways Electrification of 6 thousand 542 km road Nashik News)

मालवाहतूक, दळणवळण वाढविण्यासाठी मालवाहतूक टर्मिनल्स निर्मितीच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले. २०२१-२२ मध्ये २१, तर २०२२-२३ मध्ये ३० मालवाहतूक केंद्रांची निर्मिती करण्यात आली. त्याचवेळी जगातील सर्वांत मोठे पर्यावरणपूरक रेल्वे जाळे होण्यासाठी सहा हजार ५४२ किलोमीटर मार्गावर विद्युतीकरण करण्यात आले.

प्रतिदिन १४.४ किलोमीटर नवे मार्ग टाकत पाच हजार २४३ किलोमीटर नवीन मार्गाचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. याशिवाय भारतीय रेल्वेच्या सध्याच्या उच्च घनतेच्या मार्गांवर अधिक गाड्या चालविण्याची क्षमता वाढविण्यासाठी स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग हा उपाय अवलंबविण्यात आला आहे.

भारतीय रेल्वेने २०२१-२२ मधील २१८ किलोमीटरच्या तुलनेत २०२२-२३ मध्ये स्वयंचलित सिग्नलिंगसह ५३० किलोमीटर अद्ययावत केले. जुन्या धाटणीच्या साच्यांऐवजी संगणकावर आधारित प्रणाली असलेल्या डिजिटल इंटरलॉक्ड स्थानकांची संख्या वाढविण्यात आली.

२०२१-२२ मध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीयुक्त ४२१ स्थानके होती. २०२२-२३ मध्ये ५३८ स्थानकांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली.

प्रवाशांना लोहमार्ग ओलांडण्यासाठी २०२१-२२ मध्ये ९९४ उड्डाणपूल, भूमिगत मार्ग तयार करण्यात आले होते. २०२२-२३ मध्ये त्यांची संख्या एक हजार ६५ वर पोचली आहे. याशिवाय २०२१-२२ मध्ये उभारलेल्या ३७३ पादचारी पुलांच्या तुलनेत २०२२-२३ मध्ये ३७५ पूल बांधण्यात आले.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

railway
PAN- Adhar Linkage : पॅनकार्ड-आधार कार्डशी लिंकचा नागरिकांना आर्थिक भुर्दंड!

फाटकांमधून लोहमार्ग ओलांडणे हा सुरक्षिततेचा मोठा प्रश्‍न होता. त्यावर उपाय म्हणून २०२१-२२ मध्ये ८६७, तर २०२२-२३ मध्ये ८८० फाटक बंद करण्यात आले.

सरकत्या जिन्यांची उभारणी

‘सुगम्य भारत अभियान’अंतर्गत दिव्यांग, वयोवृद्ध आणि बालकांना रेल्वेस्थानकांवर वावर सुलभ व्हावा, या उद्देशाने भारतीय रेल्वे देशातल्या रेल्वेस्थानकांमध्ये उदवाहने आणि सरकत्या जिन्यांची उभारणी करण्यात येत आहे. २०२२-२३ मध्ये २१५ उदवाहने आणि १८४ सरकते जिने बसविण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे

- भंगार वस्तू व्यवहारातून काढून टाकणे आणि ई-लिलावातून विक्री करण्यासाठी भारतीय रेल्वे प्रयत्नशील आहे. २०२१-२२ मध्ये भंगार विक्रीतून पाच हजार ३१६ आणि २०२२-२३ मध्ये पाच हजार ७३६ कोटी रुपये मिळाले.

- भारतीय रेल्वेने २०२२-२३ मध्ये ४१४ स्थानकांच्या परिसरात यार्डांची पुनर्निमिती केली.

railway
Police Recruitment : पोलिसभरती लेखी परीक्षा; अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.