Nashik : आला पावसाळा आरोग्य सांभाळा

monsoon epidemic disease
monsoon epidemic diseaseesakal
Updated on

सिन्नर (जि. नाशिक) : शहर परिसरात अनेक दिवसांपासून कधी ऊन तर कधी रिमझिम पाऊस (Rain) असे वातावरण असल्याने या अनिश्चित वातावरणातील बदलामुळे व्हायरल फिव्हरच्या (Fever) रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डोकेदुखी, सर्दी, ताप, खोकल्यासारख्या आजारात वाढ झाल्याने शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयांत रूग्णांची संख्या वाढत आहे. (Increase in epidemic patients in Sinnar city area Nashik News)

सतत ऊन तापत असल्याने वातावरण बदल होऊन संसर्गजन्य आजारात वाढ होत आहे. सर्दी, खोकला, डोकेदुखी आदी साथ रोगाने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. येथील सामान्य रुग्णालया उपजिल्हा रुग्णालयात दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. पाऊस न झाल्याने वातावरणात उष्णता वाढली आहे. त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे.

monsoon epidemic disease
टेक्नोसेव्ही वास्तुविशारद झळकणार मनपाच्या संकेतस्थळावर

पावसाळ्यात पाण्याद्वारे मोठ्या प्रमाणात रोगाराई पसरते. त्यामुळे पाणी उकळून प्यावे, उघड्यावरचे पदार्थ खाण्याचे टाळावे, ताजे शिजविलेले अन्न खावे, विविध भाज्यांचे सूप घेतल्याने प्रतिकारशक्ती वाढते. मसालेदार, अतिआंबट, तेलकट आहार टाळावा, बाहेरील पाणी पिणे टाळावे, पावसात भिजू नये आदी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

monsoon epidemic disease
Nashik : अकरावीची प्रवेशप्रक्रिया रखडली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.