Nashik News : शिक्षकांच्या प्रोत्साहन भत्यात होणार वाढ! राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या पाठपुराव्याला यश

नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील भागातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या १५ टक्के प्रोत्साहन भत्ता किमान २०० रुपये, कमाल १ हजार देण्याची तरतूद केली आहे.
Teacher
Teacheresakal
Updated on

इगतपुरी : तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पेसा क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन भत्त्यात वाढ होणार आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांना विशेष सवलती शासनाने दिल्या आहेत.

नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील भागातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या १५ टक्के प्रोत्साहन भत्ता किमान २०० रुपये, कमाल १ हजार देण्याची तरतूद केली आहे. (increase in incentive allowance of teachers Success in pursuit of State Old Pension Organisation Nashik News)

सरकारने अतिसंवेदनशील भागाची निश्चिती केलेली नव्हती. त्यामुळे भत्ता देताना अडचणी निर्माण झाल्या. २००५ मध्ये आदिवासी विकास विभागाने राज्यातील २४ पैकी ११ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अतिसंवेदनशील घोषित केले.

यात नाशिक जिल्ह्यातील दोन्ही विभाग अतिसंवेदनशील घोषित केले. नाशिक परिक्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना मासिक १ हजार ५०० भत्ता २००६ पासून मिळायला हवा होता. मात्र, प्रशासकीय कारणांमुळे अनेक कर्मचाऱ्यांना तो भत्ता ६०० ते हजार रुपये मिळत होता.

यावर महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटनेने मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांकडे नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांना पाचव्या वेतन आयोगातील असुधारित मूळ वेतनावर प्रोत्साहन भत्ता मिळतो, तो अन्यायकारक असून, शिक्षकांना न्याय मिळण्याची मागणी केली.

Teacher
Nashik News : इगतपुरीतील 40 व्हीला, रिसॉर्ट, हॉटेलला नोटिसा! कर चुकवीत असल्याने नगरपरिषदेची कारवाई

त्यावर शिक्षण विभागामार्फत प्रस्ताव पाठविण्याचे कळविले होते. जुनी पेन्शन संघटनेने परिपूर्ण प्रस्ताव सादर केला होता. आमदार सत्यजित तांबे यांची प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत या मुद्द्यावर आवाज उठविला होता.

त्यानंतर प्रशासनाने सर्व बाबी पडताळून अतिसंवेदशील भागात कार्यरत शिक्षकांना त्या-त्या वेतन आयोगातील मुळवेतनावर प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत निर्देश दिले आहेत.

यामुळे प्रोत्साहन भत्त्यात वाढ होणार असून, २००६ पासूनचा फरकही मिळू शकतो. या निर्णयाचा लाभ संवर्ग १ ते ४ च्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना होणार आहे, अशी माहिती जुनी पेन्शन संघटनेने दिली.

Teacher
Nashik News : आगामी निवडणुकांमध्ये ‘नोटा’ला मतदान! दिंडोरी तालुक्यातील मराठा बांधवांचा आढावा बैठकीत ठराव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.