Rate Hike : नागलीच्या दरात 20 रुपयांनी वाढ

nagali prize hike
nagali prize hikeesakal
Updated on

नरकोळ (जि. नाशिक) : उन्हाळ्याच्या प्रारंभी वाळवण्याच्या पदार्थ बनविल्यास फायदेशीर असतात आणि कडक उन्हात (Summer) पदार्थ नुकसानकारक असतात.

या उद्देशाने सध्या पापड बनविण्यासाठी लागणारी नागली खरेदीसाठी महिलांची बाजारात गर्दी होत आहे. (Increase in price of nagli by 20 rupees women rush to market for shopping nashik news)

गतवर्षीपेक्षा यंदा नागली वीस रुपयांनी महाग झाली. नागलीचे पापड शरीराला फायदेशीर असतात. रोजच्या आहारात अधून मधून पापड आवश्यक असतो. पापड खाल्ल्याशिवाय भोजनाची चवच न्यारी असते.

नागली विक्रीचा हंगाम साधारण फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील वाघंबा, वर्गीपाडा, ततानी, साळवन, साल्हेर, जाड, गुळवाड, अलियाबाद या भागातून शहरात महिला नागली विक्रीसाठी आठवडे बाजारामध्ये येत आहेत. शहरातील मुख्य चौकात सकाळीच नागली विक्री होत असते.

नागलीचे विशेष महत्त्व काय
नागली चविष्ट आणि पौष्टिक असते. नागलीच्या पदार्थांमुळे रक्तदाब आणि साखर नियंत्रणात राहते. नागलीत प्रथिनं, आरोग्यदायी कर्बोदकं या पोषक घटकांचं प्रमाण जास्त असते. नागलीच्या पदार्थांचे सेवन नियमित केल्यास शरीरातील ड जीवनसत्वाची कमतरता दूर होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

nagali prize hike
Metro Neo Project : 3 महिन्यात मेट्रो निओचा नारळ फुटणार; फडणवीस यांचे आश्वासन

नागली हा ‘ड’ जीवनसत्वाचा चांगला स्त्रोत मानला जातो. याशिवाय नागलीमध्ये क, ई ही जीवनसत्वं. कॅल्शियम, लोह ही खनिजे भरपूर प्रमणात असतात. नागलीमध्ये १५ ते २० टक्के फायबरही असते. हे फायबर पचनासाठी आणि वजन कमी करण्यासाठी अतिशय महत्वाचे असते.
असे आहेत नागलीचे दर ७ किलो पायरी
यावर्षी - गेल्या वर्षी
२२० रुपये - २०० रुपये

"यावर्षी नागलीचे उत्पन्न चांगले आले आहे. नागली विक्रीचा हंगाम साधारण फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. सकाळीच विक्री होते." - किसन चौरे, वग्रीपाडा, ता. सटाणा

nagali prize hike
Nashik News : तब्बल 3 तास संरक्षण जाळीत अडकून पडला वृद्ध!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.