नाशिक : पावसाची (Rain) रिपरिप सुरूच असल्याने बाजार समितीतील सर्वच प्रकारच्या भाज्यांची (Vegetables) आवक मंदावली आहे. त्याचा परिणाम बुधवारी (ता.२७) आठवडे बाजारात सर्वच भाज्यांच्या दराने तेजी गाठल्याने गृहिणींचे आठवड्याचे बजेट कोलमडले आहे. (Increase in prices of all vegetables in weekly market due to rain nashik latest marathi news)
गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभर पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील आवक मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. त्याचा परिणाम आज आठवडे बाजारावर झाल्याचे जाणवले.
मेथी, कोथिंबीरच्या आवकेत मोठी घट झाल्याने मेथीच्या जुडीसाठी ३० रुपये, तर कोथिंबिरीच्या जुडीसाठी ४० रुपये मोजावे लागत होते. पावसामुळे पालक गायब झाली आहे. गत महिन्यात ८० रुपयांपर्यंत पोचले. टोमॅटो आता ३० रुपये किलोपर्यंत घसरला आहे.
पूर ओसरल्याने बाजार घाटावर
संततधारेमुळे गोदावरी जवळपास संपूर्ण जुलै महिने दुथडी वाहत होती. कालपासून पावसाने उघडीप दिल्याने आता पाणी कुंडात परतले आहे.
त्यामुळे गत आठवड्यात चक्क गाडगे महाराज पुलावर पोचलेला बाजार आज मूळ जागी म्हणजे गंगाघाटावरच भरला होता.
इतर भाज्यांचे दर असे (किलोमध्ये)
क्रम भाज्या दर
१. वांगी ६० रुपये
२. हिरवी मिरची ८० ते १००
३. भेंडी ८० ते १०० रुपये
४. शेवगा ८० रुपये
५. टोमॅटो ३० रुपये
६. फ्लॉवर गड्डा १५ ते २० रुपये
७. कोबी गड्डा १० ते १५ रुपये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.