Nashik News : बानाईतांच्या अडचणीत वाढ; अतिरिक्त आयुक्तांकडून खर्च वसुलीचा निर्णय

nmc
nmcesakal
Updated on

नाशिक : महापालिकेचे वाहन मुख्यालय वगळता हद्दीबाहेर घेऊन जाता येत नाही. असे असताना महापालिकेच्या नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानाईत यांनी त्यांना दिलेले वाहन अनेकदा शिर्डी येथे घेऊन गेल्याने महापालिकेच्या कार्यशाळेतील लेखा विभागाकडून प्रतिकिलोमीटर खर्च वसुलीचा निर्णय घेण्यात आला आहे. (Increase in problems of Banait Decision on recovery of expenses by Additional Commissioner Nashik News)

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर भाग्यश्री बानाईत रुजू झाल्या आहेत. आयएएस अधिकाऱ्याची अतिरिक्त आयुक्त पदावर प्रथमच नियुक्ती झाली. एक आयएएस अधिकारी दुसऱ्या आयएएस अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करू शकतो का, या प्रश्नावरून मुख्यालयात आधीच वाद आहेत.

अधिकारांच्या सुप्त वादामुळे बानाईत महापालिकेच्या कामकाजापासून अलिप्त राहतं असल्याचे दिसते. अधिकारांच्या वादामुळे त्या अनेकदा त्यांच्या दालनातदेखील उपस्थित नसतात. त्यामुळे महापालिकेला अतिरिक्त आयुक्त आहे की नाही, अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

त्यात आता महापालिका हद्दीबाहेर वाहन घेऊन गेल्याची भर पडली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निवासस्थानापासून तसेच महापालिकेशी संबंधित कामे करण्यासाठी चालकांसह वाहने दिली आहेत.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

nmc
Nashik News : नाशिकला लवकरच महिला बालविकास भवन; नियोजन समितीच्या निधीतून तहसील कार्यालय

अधिकाऱ्यांची कामे झाल्यानंतर वाहने मुख्यालयात लावावी लागतात किंवा महापालिकेबाहेर वाहन न्यायचे झाल्यास तसे कारण द्यावे लागते. परंतु, अतिरिक्त आयुक्त बानाईत यांनी महापालिकेचे वाहन परवानगी न घेता अनेकदा शिर्डी येथे घेऊन गेल्या. वाहनाच्या लॉग बुकमध्ये त्याची नोंद झाली आहे.

लेखा विभागाकडून अशा खर्चावर आक्षेप घेण्यात आल्याने तो खर्च प्रतिकिलोमीटर आठ रुपये दराने त्यांच्याकडून वसुल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

nmc
Rajya Geet : शिवसेना कार्यालयाबाहेर राज्यगीत वाजविणे बंधनकारक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.