Onion
Onionesakal

Nashik News : येवल्यात लाल कांदा आवकेत वाढ; लाल कांद्याला सरासरी 1350 रुपयांचा भाव

Published on

येवला (जि. नाशिक) : सप्ताहात येथील बाजार समिती मुख्य आवरासह अंदरसूल उपबाजार आवारावर लाल कांदा आवकेत वाढ झाली. तर बाजारभावात घसरण झाल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, ओरिसा, दिल्ली, पंजाब, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आदी राज्यात व परदेशात मागणी सर्वसाधारण होती. (Increase in red onion arrivals Average price of red onion Rs 1350 Nashik News)

सप्ताहात कांदा आवक ७३ हजार ३५३ क्विंटल झाली असून लाल कांद्याचे बाजारभाव किमान ३०० ते कमाल १७९१ तर सरासरी १३५०/- प्रति क्विंटल पर्यंत होते. तसेच, उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक ४१ हजार ३२ क्विंटल झाली असून लाल कांद्याचे बाजारभाव किमान ३०० ते कमाल १६०२ तर सरासरी १३५० प्रति क्विंटल पर्यंत होते.

सप्ताहात गव्हाच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव तेजीत असल्याचे दिसून आले. गव्हास स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांतर्गत मागणी चांगली राहिल्याने बाजारभाव तेजीत होते. सप्ताहात गव्हाची एकूण आवक २८ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान २५०० ते कमाल ३१५८ तर सरासरी २७७६ रुपयांपर्यंत होते.

सप्ताहात बाजरीच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. बाजरीस स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात बाजरीची एकूण आवक १० क्विंटल झाली असून बाजारभाव किमान २०२५ ते कमाल २६५० तर सरासरी २२५० रुपयांपर्यंत होते.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Onion
Nashik News : धुक्यामुळे महामार्ग वाहतुकीवर परिणाम अन् शेतकऱ्यांचा औषध फवारणीचा खर्च वाढला

हरभऱ्याच्या आवकेत घट

सप्ताहात हरभऱ्याच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. हरबऱ्यास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात हरभऱ्याची एकूण आवक १२ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान ३५०० ते कमाल ६००० तर सरासरी ४८०० रुपयांपर्यंत होते.

सोयाबीनचा बाजारभाव स्थिर

सप्ताहात सोयाबीनच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. सोयबीनला स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात सोयाबीनची एकूण आवक २३१ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान ४१०१ ते कमाल ५५००/- तर सरासरी ५३८१ रुपयांपर्यंत होते.

मकास व्यापारी वर्गाची मागणी

सप्ताहात मकाच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. मकास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात मक्याची एकूण आवक २३०४३ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १९५० ते कमाल २१९० तर सरासरी २१३० प्रति क्विंटल पर्यंत होते अशी माहिती बाजार समितीचे सचिव कैलाश व्यापारे यांनी दिली.

Onion
Nashik News : येवल्यात नायलॉन मांजाने तरुण जखमी; गळा चिरल्याने पडले 10 टाके

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()