बिजोरसे (जि. नाशिक) : शासनाच्या सुधारित दरानुसार कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांना १५० रुपये, तर माध्यमिकच्या शिक्षकांना १२० रुपये घड्याळी तासिकासाठी दिले जाणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. (Increase in salary of Clock Hour Basis Teachers by education department nashik news)
राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये घड्याळी तासिका तत्वावरील शिक्षकांच्या मानधनात जवळपास सोळा वर्षांनी वाढ करण्यात आली आहे. राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत व अर्धवेळ शिक्षकांसाठी आवश्यक असलेल्या कार्यभारानुसार संबंधित विषयाच्या अध्यापनासाठी प्राप्त व्यक्तीची तासिका तत्वावर नियुक्ती करावी.
जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. मानधन वाढीचा निर्णय १ डिसेंबर २०२२ पासून लागू होणार आहे. घड्याळी तासिका तत्वावर नियुक्त करण्यात येणारे शिक्षक पूर्णवेळ शिक्षकांप्रमाणे पात्रधारक असावेत. पात्रतेचे निकष पूर्ण नसलेल्या शिक्षकांची घडाळी तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येऊ नये, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
"माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ४२ व ७२ रुपये घड्याळी तासिकानुसार मानधन मिळत होते. आता दरवाढ केली असली तरी १२० व १५० रूपयांवर शिक्षक काम करण्याची शक्यता कमी आहे. ३०० व ५०० रुपये किमान मानधन देऊन शिक्षकेत्तर व शिक्षकांची त्वरित भरती करावी."
- प्रा. रवींद्र मोरे, मालेगाव तालुकाध्यक्ष, नाशिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना
"शिक्षकांना अर्धवेळ व तासिका तत्वावर मानधन देण्याऐवजी पूर्ण पगार द्यावा. तसेच, शिक्षणसेवक योजना रद्द करावी. जुनी पेन्शन योजना सरकारने लागू करावी."
- प्रा. अनिल महाजन, सचिव, नाशिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.