Nashik Crime: भेसळयुक्त मिठाईविक्रीत वाढ! घरातच तयार केलेली मिठाई सेवन करा, अन्न-औषध प्रशासन व डॉक्टरांचा सल्ला

Adulterated Mawa seized from Dwarka area.
Adulterated Mawa seized from Dwarka area.esakal
Updated on

Nashik Crime : मिठाई घेताय? भेसळयुक्त तर नाही ना, याची खात्री करूनच खरेदी करा. शहरात सध्या भेसळयुक्त मिठाई विक्रीचे प्रमाण वाढले आहे. शक्य असल्यास घरातच तयार केलेली मिठाई सेवन करा, असा सल्ला अन्न व औषध प्रशासन, तसेच डॉक्टरांकडून दिला जात आहे.

बाजारातून मिठाई खरेदी करायची झाल्यास नामांकित आणि विश्वासहार्य दुकानांतूनच खरेदी करावी. जेणेकरून भेसळयुक्त मिठाई खरेदीपासून बचाव होऊ शकेल. (Increase in sale of adulterated sweets Consume homemade sweets consult Food and Drug Administration and doctors Nashik Crime)

सणासुदीच्या निमित्ताने मिठाईस वाढती मागणी लक्षात घेता बाजारात भेसळयुक्त मिठाईची विक्री होत आहे. पर राज्यातून येणारा भेसळयुक्त मावा आणि मिठाईचा वापर शहरातील मिठाई विक्रेत्यांकडून केला जात आहे.

अन्न व औषध प्रशासनाकडून याविरुद्ध कारवाई केली जात आहे. शुक्रवार (ता. १५) द्वारका भागात कारवाई करत भेसळयुक्त मावा आणि पावडरपासून तयार केलेली मिठाईच्या पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

गणेशोत्सवात विविध प्रकारच्या मिठाईचा प्रसाद घरोघरी, तसेच सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी भाविकांमध्ये वाटप करण्यात येतो. खरेदी केलेली मिठाई भेसळयुक्त नाही ना, याची खात्री करून घ्यावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Adulterated Mawa seized from Dwarka area.
Crime News : किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावर सोळा डंपरवर हवेली पोलीसांची कारवाई

शक्य असल्यास प्रसाद किंवा भेट देण्यासाठी घरात दुधापासून तयार केलेली मिठाईचा वापर करण्यात यावा. बाजारात बहुतांशी ठिकाणी पावडरयुक्त मिठाई तयार केली जात आहे.

भेसळयुक्त मावा आणि मिठाई विक्रीचे राज्यातील विविध शहरे, तसेच परराज्याशी संबंध आहे. गुजरात, अहमदाबाद, राजस्थान यांसह मुंबई येथून शहरात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त मावा येत असतो. त्यापासून मिठाई तयार केली जाते.

Adulterated Mawa seized from Dwarka area.
Kolhapur Crime : सापावर पाय पडल्याच्या भीतीनं इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू; तापानं फणफणतं होतं अंग, CPR मध्ये नेलं पण..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.