Cattle Subsidy : गाई आणि म्हशींच्या अनुदानात वाढ! अनुसूचित जाती-जमातीसाठी योजनेची पुनर्रचना

cattles
cattlesesakal
Updated on

Nashik News : अनुसूचित जाती-जमातीसाठी योजनेची पुनर्रचना करण्यात आली आहे. यानुसार गुरांच्या बाजारामध्ये दुधाळ जनावरांच्या किमतीमध्ये भरमसाट वाढ झाल्याने गाईसाठी ७० हजार रुपये तर म्हशीसाठी ८० हजार रुपयांचे अनुदानात वाढ करण्यात आली आहे.

याबाबतचे निर्देश कृषी पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत. यामुळे पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Increase in subsidy for cows and buffaloes Restructuring of Scheme for Scheduled Castes and Tribes Nashik news)

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराद्वारे उत्पादनाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रतिलाभार्थी दोन दुधाळ जनावरांचा एक गट ७५ टक्के अनुदानावर वाटप योजना आहे.

या योजनेमध्ये प्रति दुधाळ जनावराची किंमत ही सन २०११ मध्ये निश्चित केलेली आहे. यात आतापर्यंत बदल झालेला नव्हता. पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या योजनेमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांस अधिक दूध उत्पादन देणारी दुधाळ जनावरे वाटप करणे आवश्यक आहे.

सध्याच्या स्थितीमध्ये गुरांच्या बाजारामध्ये दुधाळ जनावरांच्या किमतीत २०११ च्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दुधाळ जनावरे गट वाटप योजनेत वाटप करावयाच्या प्रति गाईची किंमत ७० हजार रुपये व प्रति म्हशीची किंमत ८० हजार रुपये केली आहे.

या योजनेंतर्गत अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांना दोन दुधाळ जनावरांचा एक गट वाटप करताना गाय गटासाठी ७५ टक्के म्हणजेच एक लाख १७ हजार ७३८ रुपये किंवा म्हैस गटासाठी एक लाख ३४ हजार ४४३ रुपये शासकीय अनुदान राहणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

cattles
Maharashtra politics : शरद पवारांचा आदेश आल्यास 'या' मतदारसंघातून लोकसभा लढवणार; रामराजेंची मोठी घोषणा

या अनुदाना व्यतिरिक्त उर्वरित २५ टक्के रक्कम लाभार्थ्यास स्वतः उभारावी लागणार आहे बँक वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या अनुसूचित जाती-जमातीसाठी पाच टक्के लाभार्थी हिस्सा व २० टक्के बँकेचे कर्ज लाभार्थ्यास या योजनेंतर्गत प्राधान्य देण्यात देण्यात येणार आहे.

सुधारित जातीच्या म्हशींचे वाटप

योजनेचा लाभासाठी लाभार्थी हा दारिद्ररेषेखालील असावा, अत्यल्प भूधारक शेतकरी, अल्प भूधारक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गटातील लाभार्थी असावा. या योजनेमध्ये एका कुटुंबातील एकच व्यक्तीला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

या योजनेमध्ये प्रतिदिन १० ते १२ लिटर दूध उत्पादन करणाऱ्या एचएफ, जर्सी या संकरित गायी प्रतिदिन आठ ते दहा लिटर दूध उत्पादन देणाऱ्या सुधारित जातीच्या म्हशी वाटप केले जाणार आहेत.

cattles
Nashik Political : दराडे बंधूंच्या सोहळ्यात दादासह मुख्यमंत्री शिंदे, महाजन, ठाकरेंची बॅटिंग!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()