Nashik: सिन्नरमध्ये डेंगूसदृश्य रुग्णांच्या संख्येत वाढ! नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागातर्फे धूर फवारणीसह सर्व्हेक्षण सुरू

Dengue Infection
Dengue Infectionesakal
Updated on

सिन्नर : शहरात डेंगूसदृश्य रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यास बदलते हवामान कारणीभूत असून, योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनासह डॉक्टरांनी केले आहे. (increase in the number of dengue like patients in Sinnar Survey started with smoke spraying by sanitation department of municipal council Nashik)

सरदवाडी भागातील अष्टविनायक रो हाऊसेस या ठिकाणी डेंगूसदृश्य अनेक रुग्ण असल्याचे स्थानिकांनी सांगितले. यावर लवकरात लवकर प्रशासनाने उपाययोजना करून येथील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहील, याची काळजी घ्यावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी विष्णू वाघ यांनी केली आहे.

खासगी लॅब आणि रुग्णालयांकडून या आजाराची माहिती घेतली जात आहे. या आजाराच्या रुग्णांचे रिपोर्ट घेऊन त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क करून घर आणि परीसराची पाहणी केली जात आहे.

ग्रामीण भागातही आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण केले जात आहे, अशी माहिती पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव दिली.

"सिन्नर शहरात डेंग्यूसदृश्‍य रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. आरोग्य विभाग व नगरपरिषदेने सर्वेक्षण करून फॉगिंग मशीनद्वारे फवारणी केली पाहिजे. चिमुकल्यापासून तर ज्येष्ठापर्यंत अनेकांना डेंगूसदृश्य आजाराची लागण झाली असून, यावर तत्काळ उपाययोजना करावी."

-पंकज मोरे, माजी नगरसेवक, सिन्नर

"शहरात नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागातर्फे धूर फवारणी सुरू आहे. जेथे आजारी रुग्ण असतील, तेथे फवारणी व संबंधित विभागाला भेट घेण्यास सांगितले आहे. पाच फवारणी ट्रॅक्टर सिन्नर शहरात रोज फवारणी करीत आहेत."-रितेश बैरागी, मुख्याधिकारी, नगरपरिषद

"आमच्या कुटुंबातील एक रुग्ण दवाखान्यात दाखल आहे. मागे एक बरा झाले आहे. डेंगू डासांची उत्पत्ती कुठे होत आहे, हे समजणे कठीण आहे. संबंधित विभागाने धूळ फवारणी, नगरांमध्ये सर्वे करणे गरजेचे आहे. मागील महिन्यांपासून डेंगूसदृश्य आजाराचे रुग्ण परिसरात आहेत."

-विष्णू वाघ, अध्यक्ष, वृक्ष फाउंडेशन

Dengue Infection
Nashik Dengue Update: 8 दिवसांत डेंगीचे सव्वाशे रुग्ण

"ताप, डोकेदुखी आणि मळमळ, ही डेंगीची लक्षणे असतात. अनेक जण आजही डेंगीच्या आजाराबाबत जागरूक नाहीत. अनेकांना हा साधा ताप असल्याचे वाटून दुर्लक्ष केले जाते. ज्यामुळे मोठ्या समस्येचे कारण ठरू शकते. शक्यतो डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित आहे. डेंग्यूसदृश्‍य रुग्णांवर रुग्णालयात उपचार केले असून, अनेकांना काळजी घेण्यास सांगितले आहे."-डॉ. प्रशांत शिंदे, एम.डी.

"पालकांनी आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, तसेच एक दिवस कोरडा पाळावा. यामुळे डेंगीसदृश्य आजारास नक्कीच अटकाव होईल. परिसरात डासांची उत्पत्ती निर्माण होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे व डासांपासून बचाव करावा. ‌"-डॉ. आनंद नागरे, बालरोग तज्ज्ञ

काय कराव्यात उपाययोजना

घरासभोवताली असणारे खड्डे बुजविणे, गटारी वाहत्या करणे, शोषखड्डे बनविणे, इमारतीवरील टाक्या, हौदांना घट्ट झाकणे बसविणे, संडासाच्या व्हेंट पाइपला जाळी बसविणे, घरातील टायर, भंगार सामान, निकामी डबे,

बाटल्या, प्लॅस्टिक साहित्याची विल्हेवाट लावणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, डासांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशक फवारणी, धूर फवारणी, मच्छरदाणीचा वापर करणे, डास प्रतिबंधक क्रीम व अगरबत्तीचा वापर करणे, रक्त नमुन्यांची तपासणी करणे.

Dengue Infection
Nandurbar Dengue News : नंदुरबारमध्ये डेंगी, चिकूनगुनियाचा डंख; अवकाळीचा परिणाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.