जुने नाशिक (जि. नाशिक) : थंडीच्या (Winter) दिवसात मेथी आणि डिंकाचे लाडू सेवन केल्याने आरोग्य सुदृढ राहते. थंडीची चाहूल लागताच घरोघरी लाडू तयार करण्याचा जोर असतो. लाडूसाठी लागणाऱ्या सुकामेव्याच्या (Dry Fruit) दरात यंदा सुमारे ३० टक्क्याने वाढ झाली आहे. त्यामुळे लाडूचा गोडवा काहीसा कडू झाला आहे.
रोगप्रतिबंधक शक्ती वाढण्यासाठी मेथी आणि डिंकाचे लाडू उपयोगी
धकाधकीच्या जीवनात अनेकांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले आहे. अशात घरातील ज्येष्ठ मंडळी मात्र सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आजही पुढे आहे. थंडीची चाहूल लागताच त्यांच्याकडून कुटुंबीयांसाठी मेथी आणि डिंकाचे लाडू तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला जातो. काजू, बदाम, खारीक (खजूर), खोबरे, अक्रोड, वेलची, डिंक, मेथी, पिस्ता अशा विविध सुका मेव्याचा वापर करून लाडू तयार केले जाते. मेथीमुळे लाडूची चव काहीशी कडू होते. यंदा मात्र महागाईमुळे कडूपणा वाढला आहे. सुका मेव्याचा गोडवा मात्र तो कडूपणा कमी करतो. अशाप्रकारे तयार केलेले लाडू आरोग्य सुदृढ राहण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. हिवाळ्याची चाहूल लागताच घरोघरी मोठ्या प्रमाणावर मेथी आणि डिंकाचे लाडू तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते. सकाळी लाडूंचे विशेष सेवन केले जाते. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या व्यक्तीनी सकाळी लाडू सेवन केल्याने दिवसभर थकवा जाणवत नाही. धरा दिवसापासून शहरात सायंकाळी आणि रात्री चांगलीच थंडी जाणवत आहे. शिवाय सध्या हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा तीन ऋतू एकाच वेळी शहरवासीयांना अनुभवास मिळत आहे. त्याचादेखील परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. नागरिकांची रोगप्रतिबंधक शक्ती वाढण्यासाठी मेथी आणि डिंकाचे लाडू उपयोगी ठरत आहे. लाडू तयार करण्यासाठी सुकामेवा आवश्यक असल्याने नागरिकांचा सुकामेवा खरेदीकडे कल वाढला आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या भीतीने नागरिकांनी बाजाराकडे पाठ केली होती. सुका मेव्याच्या खरेदी-विक्रीवर त्याचा परिणाम झाला होता. यंदा मात्र निर्बंध शिथिल असल्याने, तसेच प्रादुर्भावदेखील काहीसा कमी झाल्याने नागरिकांचा खरेदीस चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
असे आहे दर (प्रति किलो)
पदार्थाचे प्रकार गेल्या वर्षीचे दर यंदाचे दर
खोबरे १८० २४०
खजूर (खारीक) १६० २००
बदाम ६२० ६८०
काजू ६५० ७००
अक्रोड ५५० ६५०
फोडलेला अक्रोड ८५० ९५०
वेलची २ हजार ४० २ हजार २००
डिंक २४० २००
मेथी ८० १२०
गोडंबी ६५० ७५०
पिस्ता १ हजार २०० १ हजार ४००
''कोरोनाची भीती कमी झाल्याने यंदा ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुमारे ३० टक्के दरवाढ झाली आहे.'' - मयूर उग्रेज, विक्रेता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.