Nashik : पशुवैद्यकीय सेवा दरात वाढ

veterinary service
veterinary serviceesakal
Updated on

नाशिक : राज्याच्या पशुसंवर्धन विभागाला महागाई अन्‌ इंधन दरवाढीची आठवण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दारात भेट देण्यासोबत शल्यचिकित्सा प्रकरण हाताळण्यासाठीच्या सेवा दरात ५० ते ७५ टक्क्यांनी वाढ केली आहे. तसेच, पशुसंवर्धन विभागाच्या विविध सेवांच्या शुल्कात सुधारणा करण्यात आली आहे. सुधारित सेवा शुल्क २१ जूनपासून अंमलात येतील. शिवाय पशुसंवर्धन आयुक्तांना तीन वर्षांनी सेवा शुल्कात १० टक्क्यांनी वाढ करण्याचे अधिकार देण्यात आले. (Increase in veterinary service rates Nashik News)

पशुवैद्यकांच्या भेटींचे दर यापूर्वी २६ नोव्हेंबर २०१८ ला निश्‍चित करण्यात आले होते. नगरपालिका अथवा ग्रामपंचायत हद्दीमध्ये औषधोपचार अथवा शल्यचिकित्सेसाठी एका भेटीसाठी पूर्वी ७५ रुपये द्यावे लागायचे. आता 150 रुपये द्यावे लागणार आहेत.

कार्यक्षेत्राबाहेर आता 150 ऐवजी 250 रुपये द्यावे लागतील. रात्रीच्यावेळी सेवा देण्यासाठी आणि जनन प्रक्रियेत बाधा आल्यास प्रत्येकी अतिरिक्त ७५ रुपयांऐवजी आता 100 रुपये द्यावे लागतील. आरोग्य दाखल्यासाठी गाई-म्हशीसाठी 100 ऐवजी 150 रुपये, घोड्यासाठी 150 ऐवजी 200 रुपये, रासायनिक पृथ्थकरण न करता शवविच्छेदन दाखल्यांना मोठ्या जनावरांसाठी 100 ऐवजी 150, छोट्या जनावरांसाठी ७५ ऐवजी 100 रुपये आकारले जातील.

veterinary service
गिरणा पट्ट्यात कांदा मातीमोल; विक्रमी उत्पादनाने भाव घसरले

औषधोपचार आणि शल्यचिकित्सेसाठी आवश्‍यक सर्व औषधे, उपकरणे, साधन-सामग्री शेतकऱ्यांनी उपलब्ध करून द्यायची आहे. सुधारित दराची आकारणी आजपासून सुरु झाली असून, ती सरकारी सेवेतील पशुवैद्यकांसाठी लागू असेल.

veterinary service
काँग्रेसच्या 'एक व्यक्ती, एक पद' अभियानाला महाराष्ट्रात सुरुवात; नसिम खान यांचा राजीनामा

केसपेपर मोफत

राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमधून पशू-पक्ष्यांना देण्यात येणाऱ्या विविध सेवा शुल्कामधील सुधारित दर हे प्रत्येक पशू-पक्षी-तपासणी आणि चाचणीसाठीचे असतील. जनावरांच्या आरोग्यविषयक सेवा केसपेपर मोफत असेल. उपचार, खच्चीकरणासाठी प्रत्येकी दहा, रोगप्रतिबंधक लसीकरणासाठी जनावरे, कुक्कुटपक्षी यासाठी प्रत्येकी एक रुपया शुल्क राहील. लहान शस्त्रक्रियांसाठी श्‍वान व मांजराला शंभर, मोठ्या जनावरांसाठी ५०, तर वासरे, शेळी, मेंढी, वराह आणि इतरांसाठी २० रुपये आकारले जातील.

मोठ्या शस्त्रक्रियांसाठी श्‍वान व मांजराला १५०, मोठ्या जनावरांना ७०, लहान जनावरांसाठी ५० रुपये, कृत्रीम रेतनासाठी दवाखान्यात आणि शेतकऱ्यांच्या दारात प्रत्येकी ५०, गर्भधारणा तपासणी व गाई-म्हशींमधील वंधत्व तपासणी प्रत्येकी १० रुपये द्यावे लागतील. या शिवाय रोग नमुने तपासणीसाठी प्रत्येकी दहा, रक्त व रक्तजल तपासणीसाठी प्रत्येकी वीस रुपये द्यावे लागणार आहेत. पाणी, खाद्य, व्हिसेरा नमुन्याची विषबाधा तपासणी आणि दूध नमुने तपासणीसाठी प्रत्येकी शंभर रुपये राहतील. क्ष-किरण आणि सोनोग्राफी तपासणी शंभर रुपयांमध्ये करण्यात येईल. आरोग्य दाखल्यासाठी २० ते २०० रुपये आकारले जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()