पाणी साचल्याने साथरोग वाढीस; मनपाचे धुरफवारणीकडे दुर्लक्ष

Mosquito latest marathi news
Mosquito latest marathi newsesakal
Updated on

संगमेश्वर (जि. नाशिक) : शहरातील अंतर्गत रस्ते खड्डेमय झाले आहेत. या वर्षी मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचलेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डासांचे प्रमाण वाढले आहे. पावसाच्या काळात साथरोग वाढत असून, महापालिकेतर्फे औषध धूरफवारणी वेळेवर होत नसल्याने डासांमुळे डेंगी, मलेरिया आदी आजार वाढीस लागले आहेत. (Increase of epidemics due to accumulation of water Ignorance of municipal corporation smoke spraying nashik latest Marathi news)

दाट वस्ती असलेल्या शहरात झोपडपट्टी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यातच आरोग्यविषयक वेगवेगळ्या फवारणी सातत्याने करण्याची गरज असते. या फवारणीसाठी कोरोनाच्या काळात काही नगरसेवकांनी पुढाकार घेऊन आपल्या वॉर्डात फवारण्या करून घेतल्या. मात्र कोरोनानंतर फवारणी व धुराळणी करणारी यंत्रणाच लुप्त झाल्याची संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

ॉमोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने चिखलाच्या डबक्यात डासांचे प्रमाण वाढत आहे. डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंगीसदृश्य आजार पसरण्याची भीती असून, महापालिकेचा आरोग्य विभाग याबाबत गंभीर नसल्याची भीती नागरिक व्यक्त करतात.

दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर धुराळणीचे औषधी साठा असल्याचे समजते. तर यातील काही साठा मुदतबाह्य झाल्याची माहिती आहे. आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षक स्वतः प्रभागात का फिरत नाहीत? प्रत्येक प्रभागात दर दोन-तीन दिवसांनी धूरफवारणी, तसेच गटारात द्रवरूप औषधे टाकण्याचे काम व्हावे, डासांपासून नागरिकांची सुटका करून नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवावे.

आरोग्य स्वच्छता यंत्रणेला गांभीर्य नसल्याची बाब समोर येते. शहरात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, औषध फवारणीत औषधांचे प्रमाण कमी असून, त्यात इतर अनावश्यक द्रव्य टाकली जातात, असा आरोपही नागरिकांनी केला आहे.

Mosquito latest marathi news
वनोलीचा भूमिपुत्र कजाकिस्तान येथील स्पर्धेचा 'Iron Man'

अस्वच्छता, दुर्गंधी रोगराईवाढीस पोषक

शहरातील मोकळे भूखंडावर वाढलेले गवत, कचरा यांसह अनेक ठिकाणी बांधकामे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. या बांधकामांच्या ठिकाणी पाणी साचून ठेवले जाते. त्यामुळे डासांची उत्पत्ती होते. अनेक बांधकामांच्या आजूबाजूच्या परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी यामुळे रोगराई वाढीस पोषक ठरते. मोकळ्या भूखंडासह बांधकाम चालू असलेल्या विकसकांना, संबंधितास सूचना देण्याची कारवाई महापालिका बांधकाम विभाग, आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षक यांनी करावी.

"आरोग्य व स्वच्छतेच्या बाबतीत महापालिका प्रशासनाने दक्षता घेऊन अंमलबजावणीवर भर द्यावा. रोगराई व साथरोग पसरणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे."
-विठ्ठलदास तापडिया, संचालक, रोटरी मिडटाउन

"साथरोग व डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धूरफवारणी व औषधी धुराळणीचे साप्ताहिक नियोजन प्रत्येक वॉर्डात करण्यात यावे. "
-जयश्री धामणे, तालुकाध्यक्ष- महिला ओबीसी महासंघ

Mosquito latest marathi news
Nashik : अंतापूर रस्त्याची दुरवस्था, दुरुस्तीची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.