Nashik New Voter Registration: 5 वर्षांत पावणेदोन लाख मतदारांची वाढ; 25 हजार युवकांची भर

voter registration
voter registrationEsakal
Updated on

New Voter Registration : निवडणूक विभागाने राबवलेल्या मतदार नोंदणी अभियानास जिल्ह्यातील नवमतदारांनी प्रतिसाद दिल्याने पाच वर्षात जिल्ह्यात तब्बल पावणेदोन लाख मतदारांची वाढ झाली आहे.

सद्यस्थितीस जिल्ह्यात एकूण ४६ लाख ९८ हजार ५६८ मतदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या ४५ लाख २४ हजार ६६३ इतकी होती. वाढीव मतदारांचा कुणाला फायदा आणि कुणाला तोटा होतो, हे येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसून येईल. (increase of more than 1 lakh voters in 5 years in nashik news)

नाशिक, दिंडोरी हे दोन लोकसभा मतदारसंघ व धुळे मतदारसंघाचे तीन विधानसभा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यात येतात. जिल्ह्यात सद्यस्थितीला ४६ लाख ९८ हजार ५६८ मतदार आहेत. यात एक लाख ४६ हजार मतदार हे सिनिअर सिटीझन अर्थात ८० वर्षापेक्षा वरील आहेत. तर तरुण मतदारांची संख्या २५ हजार ५७६ इतकी आहे. १९ हजार ५४६ इतके दिव्यांग मतदार आहेत. वय वर्षे २० ते ६० यातील सर्वाधिक मतदार आहेत.

पाच वर्षात जिल्ह्यात एक लाख ७३ हजार मतदारांची वाढ झालेली दिसून येते. साधारणत: फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यादृष्टीने प्रशासन तयारीला लागले असून, मतदार याद्या अद्ययावत केल्या जात आहेत. दुबार नावे असलेल्या १४ हजार ८०९ मतदारांना व एकाच व्यक्तीचा फोटो दोन किंवा त्यापेक्षा अधिक ठिकाणी वापरलेल्या ४९ हजार मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

मतदार नोंदणी अजूनही सुरु असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा निवडणूक विभागामार्फत मतदार नोंदणी, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन (ईव्हीएम) प्रात्यक्षिक आणि तालुकास्तरावर कार्यरत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.

voter registration
Voter Registration App : नवीन मतदारांनो, ‘घरबसल्या’ नावनोंदणी करा; व्होटर हेल्पलाईनचा घ्या लाभ...

"मतदार नोंदणी अभियानास उत्तम प्रतिसाद लाभला. ज्या व्यक्तींनी अद्याप नाव नोंदणी अथवा दुरुस्ती केलेली नसेल त्यांना ऑनलाइन किंवा बीएलओंच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध आहे." -डॉ. शशिकांत मंगरुळे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक विभाग, नाशिक)

अशी करा मतदार नोंदणी

नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी व इतर सुविधांसाठी वोटर हेल्पलाइन ॲप उपलब्ध आहे. निवडणूक आयोगाने तयार केलेले ॲप डाउनलोड करून घ्यावे. कोणत्याही शासकीय कार्यालयात न जाता ॲपच्या मदतीने नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करणे शक्य आहे.

अथवा अस्तित्वात असलेल्या मतदार यादीतील नावात दुरुस्ती व छायाचित्रात बदलही करता येतो. गुगल प्ले स्टोअरवरील https://play.google.com/store/apps/details0id=com.eci.citizen या लिंकच्या माध्यमातून हे ॲप डाउनलोड करून या सुविधेचा लाभ घेता येईल.

नाशिक लोकसभेचे मतदार

सिन्नर : दोन लाख ९७ हजार ७४६

नाशिक पूर्व : तीन लाख ७१ हजार ३०८

नाशिक मध्य : तीन लाख १५ हजार ७७३

नाशिक पश्चिम : चार लाख ३३ हजार ७८२

देवळाली : दोन लाख ६५ हजार ४५३

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर : दोन लाख ६६ हजार ४४

voter registration
New Voter Registration : नव मतदार नोंदणीसाठी आता 9 दिवसच मुदत; 1 जानेवारीस 18 वर्षे पूर्ण होणाऱ्यांना संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.