Nashik News: गोदावरी महाआरतीत वाढावा नाशिककरांचा सहभाग! गंगा गोदावरी पुरोहित संघ- रामतीर्थ सेवा समितीत वाद

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंट्टीवार यांनी रामतीर्थाच्या विकासासाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही केली.
Godavari Mahaarti
Godavari Mahaartiesakal
Updated on

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर काळाराम मंदिरासह रामतीर्थाची महती सर्वदूर पोचली. त्यानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंट्टीवार यांनी रामतीर्थाच्या विकासासाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही केली.

मात्र येत्या १९ फेब्रुवारीच्या महाआरतीसाठी गंगा गोदावरी पुरोहित संघासह नव्याने उदयास आलेल्या रामतीर्थ सेवा समितीत वाद उपस्थित झाला आहे.

खरेतर या प्रस्तावित महाआरतीत नाशिककरांचा सहभाग वाढणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. (Increase the participation of Nashik in Godavari Maha Aarti Controversy in Ganga Godavari Purohit Sangh Ramtirth Seva Samiti Nashik News)

यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या महाआरतीत पुरोहित संघाचा पुढाकार होता. मात्र १९ फेब्रुवारीच्या गोदा जन्मोत्सवापासून सुरू होणाऱ्या महाआरतीसाठी रामतीर्थ सेवा समितीची स्थापना करण्यात आल्याने या दोन्हीत वाद उभा ठाकला आहे.

त्यातच राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी मुंबईतून घेतलेल्या ऑनलाइन बैठकीत गोदेच्या महाआरतीबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्याने संभ्रमावस्था वाढली आहे.

नाशिककर कोसो दूर

गोदावरीच्या महाआरतीसाठी यापूर्वी अनेकदा प्रयत्न झाले. मात्र प्रत्येक वेळी नाशिककर यापासून दूरच राहिल्याने बाहेरून आलेल्या निवडक भाविकांच्या उपस्थितीत महाआरती पार पडली.

हरिद्वार, वाराणसी या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या महाआरतीत बाहेरच्या भाविकांसह भाविकांसह स्थानिकांचाही मोठा सहभाग असतो.

परंतु येथील आरतीत नाशिककर अभावानेच दिसतात. आता शासकीय स्तरावर महाआरतीचे नियोजन सुरू झाल्याने यावेळीतरी नाशिककरांच्या व्यापक सहभागासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Godavari Mahaarti
Nashik Police Transfer : पंचवटी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी मधुकर कड; सोहन माछरे यांची बदली

दहा कोटींबाबत संभ्रमावस्था

राज्य शासन महाआरतीसाठी दहा कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची चर्चा जोरदारपणे सुरू होती. परंतु हे पैसे महाआरतीसाठी नव्हे तर घाटाच्या कामासाठी वापरण्यात येणार असल्याचे मंत्र्यांनी सांगितल्यावर यावर पडदा पडला.

महत्त्वाचे म्हणजे पर्यटन विभागाकडून यापूर्वी मिळालेल्या निधीतून खरेदी केलेल्या काही लाखांच्या सामग्रीचे पुढे काय झाले. हे साहित्य वापरल्यास जनतेच्या कराच्या पैशांची उधळपट्टीही होणार नाही.

मात्र पुन्हा नव्याने निधी मंजूर झाल्याने जयकुमार रावल यांच्याकाळात खरेदी केलेल्या आधीच्या साहित्याचे काय करणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

पुरोहित संघाची अपेक्षा

यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या महाआरतीत पुरोहित संघाचा पुढाकार होता. त्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या समितीच्या सदस्यांनी पुरोहित संघाच्या नेतृत्वातच महाआरती करावी.

कारण ती आजही सुरूच असल्याचे गंगा गोदावरी पुरोहित संघाने स्पष्ट केले. याबाबत योग्य तोडगा काठण्याची अपेक्षा श्री. शुक्ल यांनी व्यक्त केली.

Godavari Mahaarti
NMC News: नगर रचनाच्या अधिकाऱ्यांच्या अधिकारात कपात! 4 हजार चौरस मीटरपर्यंत बांधकाम परवानगी आयुक्तांकडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.