नवीन शाहीमार्गावर झोपड्यांच्या अतिक्रमणात वाढ

encroachment of huts on new royal road
encroachment of huts on new royal roadesakal
Updated on

म्हसरूळ (जि. नाशिक) : स्मार्ट सिटीच्या (Smart City) कामाअंतर्गत सुशोभीकरण (Beautification) करण्यात आलेल्या नवीन शाही मार्गावर झोपड्यांचे (Huts) अतिक्रमण (Encroachment) वाढत आहे. या वाढणाऱ्या अतिक्रमणाकडे महापालिका (NMC) प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने येथील झोपड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक नागरिकांसह भाविक आणि पर्यटकांची वर्दळ असलेल्या या भागातील झोपड्यांच्या अतिक्रमणाने ओंगळवाणे प्रदर्शन घडत असल्याची टीका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. (Increased encroachment of huts on new royal route Nashik News)

कोट्यवधी रुपये खर्च करून गोदा घाटाच्या सुशोभीकरणाचे कामे सुरु आहेत. त्यात गोदा घाटालगतच्या भागातील नवीन शाही मार्गाचे काम करण्यात आले आहे. गौरी पटांगण ते टाळकुटेश्वर पूल या दरम्यान हा मार्ग तयार करण्यात आला आहे. या कामामुळे या मार्गाचा नकाशाच पालटला आहे. दुभाजकासह दोन्ही बाजूला भविष्याचा विचार करून पावसाळी गटार, केबलचे जाळे आदी टाकण्यात आलेले आहे. नदीच्या बाजूला सिमेंटच्या जाळ्या लाऊन सुशोभीकरण करण्यात आले आहे. वाहनांसाठी दोन्ही बाजूला वेगवेगळे मार्ग असून, पादचाऱ्यांसाठी नदीच्या बाजूला उंचवटा करून करून मार्ग तयार करण्यात आला आहे.

मार्गाच्या वळणाचा विचार करून हा पादचारी मार्ग रुंद करण्यात आलेला आहे. नेमक्या याच पादचारी मार्गावर भिकारी तसेच भटक्या-फिरस्त्यांनी बस्तान मांडले आहे. सुरवातीला एक-दोन झोपड्या होत्या, त्यांचे प्रमाण आता वाढत आहे. या मार्गाचा अर्धा अधिक पादचारी मार्गाचा भाग या झोपड्यांनी व्यापला आहे. त्यामुळे या मार्गाला पादचारी मार्ग आहे की नाही असा प्रश्न पडत आहे. फिरस्ती, निराधार लोकांसाठी महापालिकेने निवारा शेडची व्यवस्था केलेली असताना त्या ठिकाणी हे लोक राहत नाहीत.

encroachment of huts on new royal road
Nashik : विमानसेवेसाठी राजकीय पाठबळाची कमतरता

स्मार्ट रोडचे विद्रूपीकरण

स्वतंत्रपणे अशा सुशोभीकरण केलेल्या भागात त्यांनी ठाण मांडले असल्याने स्मार्ट रोडचे विद्रूपीकरण झालेले दिसत असल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. नाशिकच्या तीर्थ स्थानाच्या दर्शनासाठी येणारे भाविक तसेच पर्यटनासाठी येणारे पर्यटक हे तपोवनाकडे जाण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणून याच नव्या शाही मार्गाचा अवलंब करीत असतात. असा स्मार्ट मार्ग झोपड्यांच्या अतिक्रमणाच्या विळख्यात पडायला नको असे नागरिकांचे म्हणणे आहे.

encroachment of huts on new royal road
Nashik : निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.