कुत्ता गोळीसह नशेचा बाजार गरम; तरुणांच्या नशेखोरीमुळे गुन्हेगारीत वाढ

kutta goli News
kutta goli Newsesakal
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : देशात मालेगाव शहर ऐनकेन कारणाने प्रसिद्धीच्या झोतात असते. गेली वीस वर्षे १२ नोव्हेंबर २०२१ ला झालेली तोडफोड, दगडफेक व अन्य तुरळक अपवाद वगळता शांततेच्या व एकात्मतेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्याचवेळी शहरात कुत्तागोळीसह विविध पदार्थांची नशा केली जाते.

नशेचा बाजार गरम असून, शेकडो तरुण स्वस्त पदार्थांची नशा करण्याच्या आहारी गेल्याने शहरातील गुन्हेगारीत वाढ झाली आहे. कुत्तागोळीसह या नशेखोरीमुळे शहर चर्चेत असतानाच एनआयच्या छापेमारीत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) प्रमुख मौलाना सैफुर रहेमान अन्सारी याला ताब्यात घेतल्याने देशपातळीवर पुन्हा मालेगावची चर्चा सुरु झाली आहे. (increased in dog pill in drug market Increase in crime due to youth drug addiction Nashik Crime Latest Marathi News)

शहरातील वाढती नशेखोरी चिंताजनक असल्याने नशामुक्तीसाठी मुस्लीम धर्मगुरू, मौलाना व सामाजिक कार्यकर्ते सरसावले आहेत. उद्या शुक्रवारी (ता. २३) जुम्माचा मुहूर्त साधून सुन्नी दावत ए इस्लामतर्फे एटीटी हायस्कूलच्या प्रांगणात संघटनेचे अध्यक्ष मौलाना सय्यद अमीनुल कादरी यांच्या अध्यक्षतेखाली नशामुक्तीसाठी सभा होणार आहे. या सभेचा प्रतिसाद व लोकसभागावरच येथील युवकांचे भवितव्य ठरणार आहे.

शहरातील तरुण नशेसाठी कुत्तागोळी (अल्प्राझोलम), दारू, चरस, गांजा, अफीम, रासायनिक भेसळयुक्त ताडी, फॅन्सडील, मिनलिंटक कोडीन, कोरॅक्ससह विविध औषधे, एमडीएम पावडर, पंक्चरचे सोल्यूशन, आयोडेक्स मलम, फेव्हीस्टीक (बॉन्डची नशा) असे विविध फंडे अवलंबत आहेत. तरुणांपाठोपाठ शालेय विद्यार्थी फेव्हीस्टीक, स्टीकफास्ट, हे ॲडीसिव्ह प्लॅस्टिकमध्ये टाकून त्याचा सुगंध घेत व तोंडात ओढत बॉन्डची नशा करीत आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या नशेचा विषय चिंताजनक आहे.

तरुण व गुन्हेगार या नशा केल्यानंतर वाटेल ते करण्यास तयार असल्याच्या आर्विभावात वावरतात. नशेखोर गुन्हेगारांनी थेट खून केल्याचे प्रकारही घडले आहे. स्थानिक पोलिस प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर कारवाया करूनही या प्रकारांना चाप बसलेला नाही. किरकोळ स्वरूपात ही औषधे व नशेची पदार्थ आणली जातात.

यामुळे संशयितांना अटक करणेही अवघड होते. अशातच अन्न, औषध प्रशासन व पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. अन्न, औषध प्रशासनाने अवैध व विना परवाना औषधी, गोळ्या विक्रीविरोधात कारवाई करणे आवश्‍यक असताना पोलिसच यात पुढाकार घेतात. अन्न, औषध विभागातर्फे मनुष्यबळाची कमतरता असल्याचे कारण दिले जाते. शासनाने हे प्रकार गांभीर्याने घेऊन यासाठी खास पथक नियुक्त करण्याची गरज आहे.

kutta goli News
बेघरांसाठी NMCचे निवारा घर; 894 बेघर लाभार्थ्यांची नोंद

व्यापक प्रमाणात कारवायाच विक्रेत्यांच्या मुसक्या आवळू शकतात. याशिवाय शहरात गुटखा विक्रीही जोमात आहे. शहराला नशामुक्त करण्यासाठी तरुणांमध्ये प्रबोधन व जनजागृती आवश्‍यक आहे. मशिदीतून मौलाना व धर्मगुरूंनी जुमाच्या नमाज पठणप्रसंगी याबाबत वारंवार संदेश देत मोहीम राबविल्यास व नागरिकांनी साथ दिल्यास नशामुक्तीच्या प्रयत्नांना बळ मिळेल.

अवैध विक्रीची साखळी खंडित करणे गरजेचे

शहरात साधारणतः: दशकापासून अल्प्राझोलम (कुत्तागोळी) या गोळीचा नशेसाठी वापर होवू लागला. हे प्रमाण वाढल्यानंतर तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी अवैध विक्री होणाऱ्या औषधे, गोळ्यांची साखळी खंडित करण्यासाठी मेडिकल असोसिएशन, अन्न, औषध प्रशासन व संबंधित यंत्रणांची बैठक घेतली.

हिमाचल प्रदेशातून अवैधरीत्या येणाऱ्या गोळ्या, औषधांना यामुळे लगाम बसला. काही दिवसांच्या शांततेनंतर उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांसह बॉम्बे मार्केटमधील गोळ्या, औषधी अवैध विक्रीसाठी बाजारात येवू लागली. अवैध विक्रीची ही साखळी खंडित करण्यासाठी अवैधरीत्या किरकोळ औषधे, गोळ्या विक्री करणाऱ्यांबरोबरच संशयित जेथून ठोक खरेदी करतात. तेथील विक्रेत्यांवरही कारवाई होणे आवश्‍यक आहे.

kutta goli News
Anti Motorcycle Theft Squad : संशयितासह 10 दुचाकी जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.