Nashik : धावत्या वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ
जुने नाशिक : धावत्या वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये सध्या प्रचंड वाढ झाली आहे. दुचाकी- कारचा यात अधिक समावेश आहे. यंदाचा उन्हाचा तडाखा (Scorching Sun) आणि वाहनांमधील विविध प्रकारच्या दोषामुळे घटना घडत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. गॅरेज चालक आणि अग्निशामक विभागाचेदेखील काहीसे अशाप्रकारचे निरीक्षण आहे. (increased incidence of fires in running vehicles Nashik News)
गेले चार ते पाच महिन्यात सतत अशा प्रकारच्या घटना विविध भागात घडल्या आहेत. अशा घटना घडण्याचे नेमके काय कारण असावे, असे प्रश्न नागरिक विशेषतः वाहनधारकांना भेडसावत आहे. याबाबत माहिती घेतली असता, वाहनांमधील विविध प्रकारच्या दोषामुळे घटना घडत असल्याची माहिती समोर आली. शिवाय जळीत वाहनांमध्ये बॅटरी, सीएनजी, एलपीजी गॅस किटच्या समस्यांमुळे घटना घडत असल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वी मुंबई नाका जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद रोड भागावरील मुख्य रस्त्यांवर वाहने जळाल्याच्या घटना घडल्या. याबाबत माहिती घेतली असता, वाहने तयार करताना बॅटरी आणि सीएनजी गॅस फिटिंग यांची बांधणी व्यवस्थित होत नाही.
बॅटरीचे पॉइंट आणि त्यावर लावण्यात येणारी वायर यांच्या लूज कनेक्शन, तसेच वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन वाहने जळून भस्मसात होत आहे. शिवाय वाहनांना लावण्यात येणारी अनधिकृत गॅस किटमुळे घटना घडत आहे. गेल्या दोन- तीन महिन्यात सात ते आठ वाहनांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय उन्हाच्या तडाख्यामुळे वाहने लवकर गरम होत आहे. अशा वेळेस गळती होणाऱ्या गॅसशी तापलेल्या वाहनांचा संपर्क आणि बॅटरीमधील लूज कनेक्शनमुळे निघणारा स्पार्क यामुळे वाहने पटकन पेट घेतात. अनधिकृत गॅस किटवर बंदी आणावी. वाहने तयार करणाऱ्या कंपन्यांनी काळजीपूर्वक वाहनांची तपासणी करून तरच वाहने बाहेर सोडावी, अशी मागणी नागरिक करीत आहे.
घटना थांबण्यासाठी हे करावे
*वाहने तयार झाल्यानंतर कंपन्यांनी पुन्हा
तज्ज्ञांकडून तपासणी करावी, ट्रायल घ्यावी.
*वाहन विक्री दरम्यान कंपनीने गॅस भरून वाहन ग्राहकांना द्यावे
*वाहन मालकांनी वेळोवेळी मेन्टेनन्स करावा.
*वेळोवेळी कूलरची तपासणी करावी, रेडिएटरमधील पाण्याची तपासणी करावी.
* अनधिकृत गॅस फिटिंग किट किंवा सीएनजी किट यांच्यावर बंदी आणावी.
"सीएनजी गॅस, एलपीजी गॅस लिकेजमुळे व फिटिंग व्यवस्थित नसल्यामुळे गॅस लिकेज होऊन चारचाकी वाहनास आगी लागतात. त्याचप्रमाणे बॅटरी आणि वायरिंग यांच्या शॉर्टसर्किटमुळे सुद्धा काही गाड्यांना आग लागत आहे. वाहने तयार करताना कंपन्यांनी या दोन्ही बाबींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे." - श्याम राऊत, लोडिंग फायरमन, अग्निशामक विभाग
"वाहन कंपन्यांनी आग लागण्याच्या घटना का घडत आहेत. यांची कारणे शोधून त्यात दुरुस्ती करावी. वायरिंग लूज कॉन्टॅक्ट आणि गॅस लिकेज यामुळे आग लागण्याच्या घटना घडत आहेत."
- मुजीब पठाण, गॅरेज मेकॅनिक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.