बिजोरसे (जि. नाशिक) : गेल्या काही दिवसांपासून उन्हाळ्याचा तडाखा (Heat Wave) जाणवत असताना सोमवार (ता. २३) पासून ढगाळ वातावरणाची अनुभूती कसमादे पट्ट्यात येत आहे. ढगाळ वातावरणामुळे (Cloudy Weather) उन्हाच्या झळा सुरू झाल्या. मात्र, उकाडा वाढल्याने कसमादे पट्ट्यात एसीचा, कुलर, पंखा याचा आधार घेताना नागरिक दिसत आहेत. (Nashik: Increased temperature due to cloudy weather Nashik News)
सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत. लग्नाच्या तारखा मर्यादित असल्याने एकाचवेळी विवाह सोहळे येत आहे. विवाह सोहळ्यांना हजेरी लावण्यासाठी उन्हाचा तडाखा डोक्यावर घेतल्याशिवाय पर्याय नाही. एप्रिल, मे व जूनमध्ये तारखा असल्याने लग्नसराई जोरात चालू आहे. कोरोनाकाळात लग्न बंदच होते. उन्हाच्या झळा जाणवू लागल्याने रस्त्यावर दुपारच्या वेळी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. सूर्याच्या तप्त किरणांमुळे जवळपास जनजीवन प्रभावित होत आहे. अशाच पूर्वमोसमी पावसाची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दरम्यान, पाणी व चाऱ्याची टंचाई शेतकऱ्यांना जाणवत आहे.
"भविष्यात तापमानवाढीची मोठी समस्या निर्माण होणार आहे. त्यावर उपाय म्हणून वृक्षलागवड करणे काळाची गरज आहे. मी दरवर्षी विद्यार्थ्यांकडून परिसरात वृक्ष लागवड करण्याचे आवाहन करतो. त्यास चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. हाच मार्ग तापमान कमी करण्याचा आहे."
- डॉ. दिनेश शिरूडे, प्राचार्य
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.