पंचवटी (जि. नाशिक) : पवित्र तिर्थस्थानावर येणाऱ्या भाविकांकडून मिळणारे खाद्य आणि मेजवानी, पैसे मिळण्याच्या आशेने रामतीर्थावर भिकाऱ्यांच्या गर्दीत वाढ झाली आहे. स्मार्टसिटी अंतर्गत भिकाऱ्यांसाठी निवाराशेडची व्यवस्था करूनही भिकारी या निवाराशेडमधून पळ काढून पुन्हा मोकळ्या जागेत येत आहेत. रामतीर्थ परिसरात भिकाऱ्यांची वाढलेली संख्या, त्यामुळे झालेली अस्वच्छता कायम असल्याने भाविक, पर्यटकांना तिर्थस्थळाचे दुसरे रुप बघायला मिळत आहे. (increasing crowd of beggars at Ram Tirtha Despite provision of shelter shed Nashik Latest Marathi News)
पंचवटी परिसरात भाविकांची नेहमीच गर्दी असते. याच धार्मिक स्थळांवर भिकाऱ्यांचा वावर वाढत आहे. या भिकाऱ्यांसाठी निवाऱ्याची व्यवस्था महापालिकेच्या इमारतीत करण्यात आलेली आहे. व्यवस्था करूनही भिकारी त्याठिकाणी थांबत नाहीत.
गोदाघाट आणि गाडगे महाराज, धर्मशाळेजवळील भागातही निवाराशेडची व्यवस्था असूनही त्याचा वापर केला जात नाही. यशवंतराव महाराज पटांगण, भाजीबाजार पटांगण, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, कपुरथळा, मुक्तेश्वर पटांगण या भागात रात्री उघड्यावर झोपणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
गोदाघाटाच्या परिसरात अन्नदानाच्या वेळी भिकाऱ्यांच्या लांब रांगा लागतात. श्राध्दविधीसाठी येणारे भाविक अन्नदान, वस्त्रदान, वस्तूदान करीत असतात. डबे, पिशव्यांचे खाद्यपदार्थ घेऊन गोदाघाटाच्या परिसरात भिकारी कायम नजरेस पडतात. लग्न सराईच्या दिवसात दाट तिथींच्यावेळी या तरुण भिकाऱ्यांना वाढपाच्या कामासाठी नेले जात असल्याची चर्चाही रामतीर्थ परिसरात आहे.
प्रशासनाने राबवावा उपक्रम
मे २०१८ महिन्यात पोलिस आयुक्त डॉ. सिंघल यांनी रामतीर्थावरील भिकाऱ्यांना एकत्र करून, त्यांना स्वच्छ करून चांगले कपडे दिले होते. यातील काहींना समुपदेशन करून चांगले शिक्षण व काम करण्यासाठी उद्युक्त केले होते.
सुधारणाऱ्यांची संख्या चांगल्या पैकी होती. हा अभिनव उपक्रम मागे पडला आहे. असाच काही उपक्रम प्रशासनाने राबवीत रामतीर्थावर भिकाऱ्याचे लागलेले ग्रहण कमी करण्याचा प्रयत्न करावा,अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.