Online Electricity Bill : ऑनलाईन वीजबिलाला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद!

Online Electricity Bill Payment
Online Electricity Bill Paymentesakal
Updated on

नाशिक : महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन पेमेंट सुविधांचा वापर करीत राज्यातील महावितरणच्या घरगुती, औद्योगिक व वाणिज्य वर्गवारीतील एक कोटी ११ लाख ५३ हजार ७०३ लघुदाब ग्राहकांनी नोव्हेंबर महिन्यात ऑनलाईन पेमेंटचा पर्याय स्वीकारला आहे. या ग्राहकांकडून वीजबिलाच्या भरण्यापोटी एकूण २२३० कोटी सहा लाख इतकी रक्कम भरली आहे.

नाशिक परिमंडळात ८ लाख ३५ हजार ८७४ ग्राहकांकडून १६० कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. प्रत्येक ग्राहकाला ऑनलाईन पेमेंटवर ०.२५ टक्के सवलत मिळत त्यामुळे ऑनलाईन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. (Increasing customer response to online electricity bill Nasik News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

नाशिक मंडळात ४ लाख ५३ हजार ९६१ ग्राहकांकडून ८६ कोटी १४ लाख, मालेगांव मंडळात ९८ हजार ८२६ ग्राहकांकडून २२ कोटी ८६ लाख आणि नगर मंडळात २ लाख ८३ हजार ८७ ग्राहकांकडून ५१ कोटी ६ लाख रुपयांचा भरणा अशाप्रकारे एकूण नाशिक परिमंडळात ८ लाख ३५ हजार ८७४ ग्राहकांकडून १६० कोटी ६ लाख ऑनलाईन भरणा करण्यात आला आहे. ऑनलाईन वीज बिल भरणा करण्यात कोकण प्रादेशिक विभागाचे ग्राहक आघाडीवर असून एकूण ४९ लाख २१ हजार ६९३ ग्राहकांनी १००१ कोटी १३ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

तर याखालोखाल पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या ३३ लाख ७५ हजार ४७१ ग्राहकांनी ७५१ कोटी ८५ लाख इतका तर नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्या १९ लाख ३३ हजार २५६ ग्राहकांनी २९९ कोटी १५ लाख इतका भरणा केला आहे. याचबरोबर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या ९ लाख २३ हजार २८३ इतक्या ग्राहकांनी १७७ कोटी ९६ लाख इतका ऑनलाईन भरणा केला आहे.

Online Electricity Bill Payment
Devidas Pingle | चुंभळे, पाटील, केदारांकडून उच्च न्यायालयाचा अवमान : देवीदास पिंगळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.