Increased Encroachment in City : वाढतं अतिक्रमण वाहतूक कोंडीचं कारण ठरतंय!

Due to encroachment, Sunday Karanja caused a traffic jam in the area.
Due to encroachment, Sunday Karanja caused a traffic jam in the area.esakal
Updated on

जुने नाशिक : वाढते अतिक्रमण आणि अनधिकृत थांबे वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहे. दिवसेंदिवस विविध प्रकारचे अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. मुख्य रस्ते आणि बाजारपेठेत दिवसाकाठी अतिक्रमण वाढत आहे. हॉकर्स झोनची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही. वाटेल तो वाटेल त्या ठिकाणी व्यवसाय थाटून अतिक्रमण करत आहे. (Increasing encroachment is causing traffic jams in city Nashik News)

मुख्य बाजारपेठेत काही दुकानदार अनधिकृतरीत्या काही फेरीवाल्यांकडून दोन, पाचशे रुपये घेऊन त्यांना दुकानासमोरील रस्त्यावर त्यांचा हातगाडी, दुकान लावण्यास परवानगी देत आहे. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी होत आहे. महिना दोन महिन्यानंतर तात्पुरत्या स्वरूपाची एक-दोन तास अतिक्रमण मोहीम राबविली जाते. त्याचीही माहिती पूर्वीच अतिक्रमणधारकांना दिली जाते.

त्यामुळे ती अतिक्रमण मोहीम नावालाच ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो. दुसरीकडे पोलिसांकडून वाहतुकीचे योग्य नियोजन केले जात नाही. मुख्य रस्त्यांमध्ये अनधिकृत वाहन थांबे करून घेतले जातात. त्यात अधिकतम प्रमाण रिक्षा थांब्याचे असते. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी अनधिकृत पार्किंग वाहतूक कोंडीत भर घालत असते. पोलिसांकडून मात्र सर्रास याकडे दुर्लक्ष केले जाते.

याचे उत्तम उदाहरण रविवार कारंजा परिसर आणि बोहरपट्टी कॉर्नर, द्वारका, दिंडोरी नाका, सीबीएस अशा विविध ठिकाणी बघावयास मिळते. पोलिसांकडून अशा अनधिकृत थांब्यावर तसेच पार्किंगवर कारवाई केल्यास वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे महापालिकेकडून सतत अतिक्रमण मोहीम राबविल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल.

Due to encroachment, Sunday Karanja caused a traffic jam in the area.
Nashik : नांदगाव तालुक्यात 290 वनराई बंधारे; शेकडो हेक्टर शेती येणार ओलिताखाली!

काय करता येईल उपाययोजना?

-मुख्य रस्ते, बाजारपेठ परिसरात सतत अतिक्रमण मोहीम राबवावी.

-महापालिकेकडून हॉकर्स झोनची संख्या वाढवावी.

-फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन सक्तीचा करावा.

-मनपाकडून पार्किंगसाठी जागा उपलब्ध करावी.

-पोलिसांनी पार्किंगवरच वाहने पार्कची सक्ती करावी.

-बाजारपेठेतील दुकानदारांनी पार्किंग व्यवस्था करावी.

-विविध प्रकारचे सूचना फलक लावावे.

-वाहतूक बेटांचे (सर्कल) आकार कमी करावे.

-वर्दळीच्या ठिकाणी सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करावी.

-आवश्यक त्या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करावे.

"महापालिकेकडून सतत अतिक्रमण मोहीम राबवावी. फेरीवाल्यांना हॉकर्स झोन सक्तीचे करावे. असे केल्यास मुख्य रस्ते मोकळा श्वास घेतील आणि वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल." - अफजल काजी, नागरिक

Due to encroachment, Sunday Karanja caused a traffic jam in the area.
Nashik Crime : पोलिसपाटलांवरील प्राणघातक हल्ला उघड करण्यात ग्रामीण पोलिसांना यश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.