Nashik News: ब्रह्मगिरी रोपवेला वाढता विरोध! पर्यावरणप्रेमींसह स्थानिक रहिवासी व पुरातत्त्व विभागाचाही नकार

Rope Way (File Photo)
Rope Way (File Photo)Sakal
Updated on

Nashik News : अंजनेरी ते ब्रह्मगिरी या साडेपाच किलोमीटरच्या ‘इको सेन्सिटिव्ह झोन’मध्ये तब्बल ४५० गिधाडांचा अधिवास आहे. या दोन्ही डोंगरांना जोडण्यासाठी रोपवे उभारल्यास या गिधाडांचे काय होईल म्हणून या प्रस्तावाला स्थानिक रहिवाशांबरोबरच पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध केला आहे.

हा विरोध न जुमानता रोपवेचा प्रस्ताव पुढे रेटल्यास पर्यावरणप्रेमी खासदार हेमंत गोडसे यांच्या विरोधात न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. (Increasing opposition to Brahmagiri Ropeway Rejection by local residents and archeology department along with environmentalists Nashik News)

संपूर्ण भारतात पंधराशे गिधाडे अस्तित्वात आहेत. त्यापैकी ४५० गिधाडे हे फक्त अंजनेरी ते ब्रह्मगिरी या भागात आढळतात. विशेष म्हणजे, येथील जंगल हे गिधाडांचे ‘मॅटर्निटी होम’ असल्यामुळे नवीन गिधाडांना जन्म देण्यासाठी ते येथे येतात.

गिधड आणि जैवविविधता संवर्धनाकरिता अंजनेरीचे जंगल आवश्यक आहे. या दोन्ही डोंगरांना जोडणारा रोपवे प्रस्तावित आहे. त्याला स्थानिकांनी तीव्र विरोध केला. केवळ पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा सुमारे ३०० कोटी रुपयांचा रोपवे येथे उभारण्याचा प्रस्ताव आहे.

पण रोपवे उभारण्यासाठी कशाही प्रकारे बांधकाम केले जाते. पुरातत्त्व खात्याच्या नियमांचे पालन होत नाही, म्हणून त्यांनीही या प्रस्तावित रोपवेच्या विरोधात ठराव केला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rope Way (File Photo)
Nashik News: मालेगावला चिमुकल्यांवर अवघड शस्त्रक्रिया यशस्वी! महिन्याच्या उपचारानंतर नवजात शिशू ठणठणीत

विशेष म्हणजे, पुरातत्त्व विभागाने थेट महाराष्ट्रातील एका गडकिल्ल्यांवर रोपवेची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. पर्यटन विभागानेही याविरोधात भूमिका घेतली आहे. पर्यावरणाचा समतोल बघडविण्याचा प्रयत्न केल्यास प्रसंगी न्यायालयातही जाण्याची तयारी पर्यावरणप्रेमींनी ठेवली आहे.

"स्थानिक रहिवासी व पर्यावरणप्रेमींचा विरोध डावलून रोपवे उभारण्याचा निर्णय झाल्यास आम्ही खासदार गोडसे यांच्या विरोधात प्रचार करू. राजकीय पक्ष म्हणून नाही तर पर्यावरणविरोधी म्हणून आम्ही घरोघरी जाऊन त्यांना मतदान करू नका, अशी भूमिका घेणार आहोत."

- रमेश अय्यर, पर्यावरणप्रेमी, गिव्ह संस्था

"नाशिकमध्ये जास्तीत जास्त पर्यटक आले पाहिजे, पण स्थानिक नागरिकांच्या विरोधात भूमिका घेऊन कुठलाही उपक्रम यशस्वी होत नाही. आम्ही पाच ठिकाणी मूलभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने आमचे काम चालू आहे."

- मधुमती सरदेसाई, उपसंचालक, एमटीडीसी नाशिक

Rope Way (File Photo)
Nashik News: गिर्यारोहकांनी मैत्रीचा झेंडा फडकविला शिखरावर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.