Independence Day 2023: खादी, पांढऱ्या रंगाच्या कपड्यांना मागणी!

खादी ग्रामोद्योग केंद्रात स्वातंत्र्य दिनानिमित्त ९ ते २० ऑगस्ट क्रांती दिन सप्ताह
Citizens while shopping for Khadi clothes
Citizens while shopping for Khadi clothesesakal
Updated on

Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिनानिमित्ताने खादी आणि पांढऱ्या रंगाच्या कपड्यांना मागणी वाढली आहे. खादी ग्रामोद्योग केंद्रात स्वातंत्र्य दिनानिमित्त ९ ते २० ऑगस्ट क्रांती दिन सप्ताह साजरा केला जात आहे.

खादी कपड्यांच्या खरेदीवर दहा टक्के विशेष सूट देण्यात आली आहे. (Independence Day 2023 Demand for Khadi White Color Clothes nashik)

अवघ्या चार दिवसांवर १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिन येऊन ठेवला आहे. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, तसेच कामगार दिन यादिवशी ध्वजारोहण करण्यात येते. अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांकडून सफेद कपडे परिधान केले जातात.

विशेष करून खादीच्या कपड्यांना अधिक पसंती असते. यंदाही खादीसह पांढऱ्या कपड्यांना मागणी वाढली आहे. बाजारपेठेत विविध डिझाइनमध्ये पांढरे कपडे विक्री होत आहेत.

पांढरे शर्ट-पॅन्ट, साडी, कुर्ता, नेहरू शर्ट, टी-शर्ट, पंजाबी ड्रेस अशा विविध कपड्यांचा यात समावेश आहे. तरुणांकडून शर्ट आणि टी-शर्टला अधिक मागणी आहे, तर तरुणींकडून पंजाबी ड्रेस आणि कुर्ता यास अधिक मागणी आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नागरिक खादीच्या कपड्यांना पसंती देत आहे.

मागणी लक्षात घेता खादी ग्रामोद्योग केंद्रात ९ ते २० ऑगस्ट क्रांती दिन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यात खादीचे कुठलेही कपडे खरेदी करण्यावर दहा टक्के विशेष सूट देण्यात आली आहे.

नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर चिमुकल्यांसाठी तिरंगा, आय लव इंडिया, तसेच विविध रंगाचे टी-शर्ट बाजारात उपलब्ध झाले आहे. त्यांचीही जोरदार विक्री होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Citizens while shopping for Khadi clothes
Independence Day 2023 : स्वातंत्र्यदिनी या ठिकाणी असतं जोरदार डेकोरेशन, 15 ऑगस्टला या ठिकाणी नक्की भेट द्या

ध्वजाच्या दरांमध्ये वाढ

खादीच्या ध्वजांना विशेष मागणी असते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहा टक्के वाढ झाली आहे. शिवाय गेल्या वर्षी हर घर तिरंगा उपक्रमानिमित्ताने ८०० ते ९०० ध्वजाची विक्री झाली होती. या वर्षी आत्तापर्यंत ५०० ध्वजांची विक्री झाली आहे. दोन बाय तीन आकाराच्या ध्वजांची अधिक विक्री होत आहे.

असे आहे दर

पँट ५०० ते एक हजार ५००

शर्ट ५०० ते एक हजार २००

साधे शर्ट ३०० ते एक हजार

पायजमा ५००

टी-शर्ट २०० ते ५००

पांढरी साडी ५०० ते दोन हजार

Citizens while shopping for Khadi clothes
Har Ghar Tiranga Campaign: शिक्षण विभागाने घातला ध्वजवंदनचा घोळ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.