Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजारपेठेला तिरग्यांचा साज; टी- शर्ट, कुर्ता घेण्यासाठी गर्दी

On the occasion of Independence Day, there was a rush on Monday to buy the tricolor in Khadi Gramodyog Bhandar. Tricolor t-shirts on sale for toddlers.
On the occasion of Independence Day, there was a rush on Monday to buy the tricolor in Khadi Gramodyog Bhandar. Tricolor t-shirts on sale for toddlers. esakal
Updated on

Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजारात लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत विविध टी-शर्ट, कुर्ता दाखल झाले आहेत.

आठ दिवस राहिल्याने बाजारपेठेला तिरंग्याचा साज आला आहे. शासकीय, खासगी कार्यालयीन ठिकाणी, बँक महाविद्यालयात, शाळांमध्ये, विविध संस्थांकडून ध्वज घेण्यासाठीही गर्दी आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्त अलीकडे शाळेसह सामाजिक संस्था विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेत असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह पालकांना उत्सुकता असते. (Independence Day 2023 people buying tricolour t shirt kurta on occasion nashik news)

देशप्रेम दर्शविणारे लहान मुलांचे टी-शर्ट, कुर्ता, महिलांसाठी साड्या, ओढणी आदी विविध वस्तू विक्रीसाठी दालनांमध्ये उपलब्ध आहेत.

मेनरोड, कॉलेज रोड तसेच उपनगरांमध्ये लहान मुलांसाठी इंडिया, भारत, जय हिंद, वंदे मातरम असे विविध संदेश लिहिलेले टी- शर्ट उपलब्ध झाले आहेत. पुरुषांसाठी सफेद रंगाचे टी-शर्ट आणि कुर्ता– पायजमा बाजारात उपलब्ध आहेत.

लहान मुलांच्या टी-शर्ट सोबतही मुलींचे फ्रॉक बाजारात दाखल झालेले आहेत. तसेच, खादी भांडारात कार ध्वज, टेबल ध्वज, मोटर बोनेट ध्वज आदी वस्तूही आहेत. या वस्तूंच्या किमती १३५ ते सहाशेपर्यंत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

On the occasion of Independence Day, there was a rush on Monday to buy the tricolor in Khadi Gramodyog Bhandar. Tricolor t-shirts on sale for toddlers.
Independence Day 2024 : स्वातंत्र्यदिन लाल किल्ल्यावरच का साजरा होतो? जाणून घ्या रंजक कारण

ध्वजाच्या किमतीत वाढ

शासकीय, खासगी कार्यालये, बँक, शैक्षणिक संस्थांतर्फे खादी भांडारातून राष्ट्रध्वज खरेदी केले जात आहेत. दोन बाय तीन फुटाचा राष्ट्रध्वज एक हजार वीस, तीन बाय साडेचार फुटाचा राष्ट्रध्वज दोन हजार दोनशे, चार बाय सहा फुटाचा ध्वज दोन हजार ६४० रुपये आहे. दोन बाय तीन फुटाच्या ध्वजाला सर्वाधिक मागणी आहे. दोन बाय तीन फुटाचा ध्वज ५० रुपये तर तीन बाय साडेचार फुटाच्या ध्वजाची किंमत २६० रुपये वाढली आहे.

"स्वातंत्र्य दिनासाठी शासकीय, खासगी कार्यालये, बँक, शैक्षणिक संस्थांतर्फे ध्वजाची मागणी आहे. कार ध्वज, टेबल ध्वज, मोटर बोनेट ध्वजालाही मागणी आहे." -विजय शेलार, व्यवस्थापक, खादी ग्रामोद्योग भांडार

"तिरंगा, इंडिया नाव असलेल्या टी-शर्ट मागणी आहे. यंदा लहान मुलींचे फ्रॉकही आले असून १२० ते अडीचशेपर्यंत किमती आहेत." -फैजान शेख, व्यावसायिक

On the occasion of Independence Day, there was a rush on Monday to buy the tricolor in Khadi Gramodyog Bhandar. Tricolor t-shirts on sale for toddlers.
Independence Day 2023 : अखंड भारताच्या निर्मितीतील 'महानायका'ची अनटोल्ड स्टोरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.