देशात यंदा ३ हजार १६० लाख टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज

 food Grain production
food Grain productionesakal
Updated on

नाशिक : देशात यंदा दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार अन्नधान्याचे तीन हजार १६० लाख, तर कडधान्यांचे २६९.५, तेलबियांचे ३७१.५ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. नवी दिल्लीतील खरीप अभियानासाठीच्या राष्ट्रीय कृषी संमेलनाचे उदघाटन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांच्या हस्ते झाले. संमेलनात २०२२-२३ साठी तीन हजार २८० लाख टन अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले.

 food Grain production
नाशिक : शेवगा लागवड योजनेतंर्गत प्रतिहेक्टरी ३० हजार अनुदान

डाळी आणि तेलबियांचे यंदा उत्पादन अनुक्रमे २६९.५ आणि ३७१.५ लाख टन असेल. तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार २०२०-२१ मध्ये फलोत्पादनाचे तीन हजार ३१० लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी कीटकनाशके आणि बियाणांची उपलब्धता निश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार (Central and State Governments) एकत्र काम करतील, असे श्री. तोमर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की युरियाच्या जागी नॅनो-युरिया वापरावा. सरकार नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीवर यापुढे भर देत राहील.

 food Grain production
सोलापूर : लागवड खर्च कमी व उत्पादन अधिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()