Nashik Protest News : सुरक्षा अधिकाऱ्याकडून वाहकाला अरेरावी; इंडियन ऑईल प्रकल्प मालक-चालक-वाहकांचा बंद

Indian Oil Project Owner Driver Carriers protest Against arbitrary action by security officials nashik news
Indian Oil Project Owner Driver Carriers protest Against arbitrary action by security officials nashik news
Updated on

Nashik News : इंडियन ऑईल इंधन प्रकल्पातील सुरक्षा अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराविरुद्ध इंधन वाहतूकदार मालक-चालक-वाहकांनी आंदोलन करून संप पुकारला आहे. संबंधित अधिकाऱ्याची येथून बदली करण्याची मागणी वाहतूकदारांनी मंगळवारी (ता. ३१) केली. (Indian Oil Project Owner Driver Carriers protest Against arbitrary action by security officials nashik news)

इंडियन ऑइल प्रकल्पातील सुरक्षा अधिकारी कुलारी यांनी टँकरवर असलेल्या वाहकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून कामावरून काढून टाकले. सदर कर्मचारी हा गरीब व होतकरू असून, त्याने रीतसर गेटवरून कायदेशीर पूर्तता करून टँकर भरण्यासाठी आत प्रवेश केला होता.

मात्र, संबंधित सुरक्षा अधिकाऱ्याने कुठलीही विचारपूस न करता त्यास अरेरावी करीत त्याचा गेटपास जमा करून घेतला.

Indian Oil Project Owner Driver Carriers protest Against arbitrary action by security officials nashik news
Nashik News : अंगणवाडीसेविका, मदतनीस यांना 2 हजार रुपये भाऊबीज; सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडीसेविकांना फायदा

‘यापुढे कंपनीत येऊ नको आणि तुझ्याबरोबर असेल त्यांनाही एकेकाला बाहेर काढून टाकेन’ अशी धमकी दिली.

त्यामुळे संतापलेल्या टँकर मालक-चालक-वाहकांनी या अधिकाऱ्याच्या विरोधात बंद पुकारून टँकर न भरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी केला जाणारा इंधनपुरवठा ठप्प झाला आहे.

Indian Oil Project Owner Driver Carriers protest Against arbitrary action by security officials nashik news
Nashik News : ‘जायकवाडी’चा मृत पाणीसाठा वापरा; गंगापूरचे पाणी देण्यास आमदार प्रा. फरांदेंचा विरोध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.