नाशिकच्या कांद्यासमोर पाक, चिनी कांद्याचे आव्हान!

onion
onionesakal
Updated on

नाशिक : कोरोना विषाणू फैलाव (coronavirus) रोखण्यासाठी लॉकडाउनच्या (lockdown) कडक निर्बंधामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील (market) कांद्याचे लिलाव (onion auction) थांबले आहेत. हे निर्बंध २३ मेपर्यंत असले, तरी सुट्यांमुळे त्या पुढील आठवड्यापर्यंत खरेदीच्या ७५ टक्के कांदा देशांतर्गत आणि परदेशातील बाजारपेठेत रवाना होत राहील. नेमक्या अशाच कालखंडात निर्यातीसाठी लागणाऱ्या कंटेनरच्या तिप्पट भाड्यामुळे भारतीय कांद्याचा टनाचा भाव ३२० डॉलरपर्यंत पोचला आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा कांदा (pakistan onion) २२० डॉलर भावाने विकला जात आहे. येत्या आठवड्यात चीनच्या कांद्याची ‘शिपमेंट' (shipment) सुरु होईल. त्यामुळे पाकसोबत चीनच्या कांद्याचे (china onion) आव्हान भारतीय कांद्यापुढे (indian onion) उभे ठाकणार आहे. (Indian onions will face Chinese onions along with Pakistan)

onion
पोटात बाळ घेऊन कोरोनारुग्णांची सेवा करणारी गर्भवती हिरकणी!

भारतीय कांद्यापुढे उभे आव्हान

द्राक्षांची निर्यात जवळपास संपल्यात जमा असल्याने कांद्यासाठी कंटेनरचे भाडे कमी होईल, असे निर्यातदारांना वाटत होते. युरोपच्या बाबतीत हे खरे ठरले. युरोपसाठी मागील महिन्यात कंटेनरला साडेचार हजार डॉलर द्यावे लागत होते. ते आता तीन हजार ८०० डॉलर झाले आहे. पण, युरोपसाठी जाणाऱ्या कांद्याचे प्रमाण फारसे नाही. अशातच, या महिन्यानंतर हॉलंडचा नवीन कांदा सुरू होईल. त्यामुळे युरोपियन बाजारपेठांमध्ये हॉलंडचा कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. भारतीय कांदा ४० ते ५० टक्के अरब राष्ट्रांमध्ये निर्यात होतो. त्यात दुबई, यमन, सौदी अरेबिया, इराक, इराण, मलेशिया, सिंगापूरचा समावेश आहे. सिंगापूर आणि मलेशियासाठी गेल्यावर्षी कंटेनरचे भाडे ३० टन कांद्याला ७०० ते ८०० डॉलरपर्यंत आकारले जात होते. आता मात्र हे भाडे दोन ते दोन हजार २०० डॉलरपर्यंत आहे. म्हणजेच काय, तर किलोला साडेसहा रुपये भाडे निर्यातदारांना द्यावे लागते. दुसरीकडे पाक आणि चीनच्या कांद्याच्या निर्यातीसाठी किलोला तीन ते चार रुपयांपर्यंत भाडे द्यावे लागते. यावरून निर्यातीच्या कांद्याचे भाव वाढत असल्याचे दिसून येते. दरम्यान, श्रीलंकेसाठी गेल्या वर्षी एका दरवाजाच्या आणि वातानुकूलित नसलेल्या कंटेनरचे भाडे ३०० डॉलर होते. ते आता एक हजार ४०० डॉलर झाले आहे.

onion
नाशिकमध्ये वाडा खोदकामात सापडला भुयारी मार्ग! विविध चर्चांना उधाण

रस्त्याने कांदा वाहतुकीला परवानगी

लॉकडाऊनच्या कडक निर्बंधामध्ये कांदा बाहेरच्या राज्यात पाठवण्यासाठी रस्त्याने वाहतूक करण्यास परवानगी असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बाजार समित्यांमधील व्यवहार बंद असले, तरीही कांदा राज्याच्या बाहेर पाठवला जाईल, असे कांद्याच्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगालकडे नाशिकचा कांदा रवाना होईल. व्यापाऱ्यांनी बाराशे ते चौदाशे रुपये क्विंटल भावाने खरेदी केलेल्या कांद्याची विक्री १७ ते १९ रुपये किलो या भावाने होईल. रमजान ईदमुळे सिंगापूरची बाजारपेठ दोन, तर अरब राष्ट्रांमधील बाजारपेठा आठवडाभर बंद राहणार आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे येत्या आठवडाभरात निर्यातीच्या जोडीला देशातंर्गत कांदा पाठवण्यावर भर राहील.

उन्हाळ कांद्याची होईल साठवणूक

पोळ, रांगडा कांदा आता संपल्यात जमा आहे. त्यामुळे उन्हाळ कांदा विक्रीसाठी येत आहे. उन्हाळ कांदा अधिक काळ टिकत असल्याने शेतकऱ्यांकडून त्याची साठवणूक सुरू होईल. त्यामुळे स्वाभाविकपणे कांद्याच्या भावात किलोला एक ते दोन रुपयांनी वाढ होईल, असा अंदाज निर्यातदारांनी यापूर्वीच बांधला होता. प्रत्यक्ष बाजारात नेमकी अशीच स्थिती तयार झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()