1 Station 1 Product Scheme : नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर पैठणी स्टॉल

Uma Khapre, Sangeeta Gaikwad, Girish Palve, Manda Phad, Shilpa Parnerkar and women while inaugurating Paithani Dalna at railway station.
Uma Khapre, Sangeeta Gaikwad, Girish Palve, Manda Phad, Shilpa Parnerkar and women while inaugurating Paithani Dalna at railway station.esakal
Updated on

नाशिक रोड : केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत व भारतीय रेल्वेच्या वन स्टेशन वन प्रॉडक्ट योजनेअंतर्गत नुकतेच पैठणी दालनाचे उद्‌घाटन करण्यात आले. रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्थेला नाशिक रोड रेल्वे स्थानकात येवल्याची पैठणी विक्रीसाठी स्थान मिळाले असून, उद्‌घाटनापूर्वीच प्रवाशांनी पैठणी खरेदी सुरू केली आहे. यामुळे स्थानिक कलाकार, विक्रेत्यांना रोजगार मिळणार असून स्थानिक वस्तूंना हायटेक बाजारपेठ मिळणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने वन स्टेशन वन प्रॉडक्ट योजना आणल्याने स्थानिक उत्पादनाला मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली असली तरी केंद्राने देशभरातील रेल्वे स्थानकांपैकी प्रथम यादीत ५३२८ स्टेशनचा समावेश करण्यात आला होता. परंतु यातील कमी प्रवासी संख्या असलेल्या स्टेशनवर स्टॉल लावण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने लक्षात आल्यावर ज्या स्थानकांवर रोज हजारो प्रवाशांची ये-जा होत असते अशा ७५० रेल्वे स्थानकाची यादी नव्याने जाहीर केली आहे. (Indian Railway 1 Station 1 Product Scheme Paithani Stall at Nashik Road Railway Station Nashik Latest Marathi News)

Uma Khapre, Sangeeta Gaikwad, Girish Palve, Manda Phad, Shilpa Parnerkar and women while inaugurating Paithani Dalna at railway station.
Dhule News : बिजासनी घाटात अपघातात एक ठार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून ही योजना भारतीय बाजारात चीनी वस्तूंना टक्कर देण्यासाठी बनविण्यात आली आहे. यात खादी ग्रामोद्योग, हातमाग उद्योग, कापड, हस्त उत्पादने, पारंपारिक वस्त्र, स्थानिक शेती उत्पादने, प्रक्रिया व उपप्रक्रिया केलेले अन्न उत्पादने, चित्रकला, शिल्पकला, आयुर्वेद औषधे यांचा समावेश करण्यात आला आहे.

रेल्वेकडून उत्पादक विक्रेते कंपनी, महिला बचतगट किंवा संस्थेला स्टॉल उपलब्ध करून देण्यात येत आहे. भुसावळ विभागातील नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, अमरावती, खांडवा आणि बऱ्हाणपूर या स्थानकांचा समावेश आहे. नाशिक रोडला पैठणी स्टॉलचे उद्‌घाटन करण्यात आले असून, देश- विदेशात प्रसिद्ध असलेली पैठणी प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या वेळी भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष गिरीश पालवे, महिला शहराध्यक्ष गौरी आडके, रश्मी बेंदळे, संगीता गायकवाड, शिल्पा पारनेरकर, ज्योती चव्हाणके, सारिका वाघ, सुजाता जोशी, संगीता वाघ, प्रशांत जाधव, नितीन चव्हाणके, पूजा वाघ, सुनील पवार, राजेश पलारिया, अमोल ठाकूर, प्रकाश फड, ऋषिकेश फड आदी उपस्थित होते.

Uma Khapre, Sangeeta Gaikwad, Girish Palve, Manda Phad, Shilpa Parnerkar and women while inaugurating Paithani Dalna at railway station.
Traffic Crisis : वाहनाचालकांना पट्ट्याचा अन् पोलिसांना ‘ठोस’ कारवाईचा विसर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()