Nashik Crime : इंदिरानगर पोलिसांकडून कॉफी शॉपवर कारवाई; अश्लील चाळे करण्यासाठी केबिन

A cabin built into a coffee shop
A cabin built into a coffee shopesakal
Updated on

Nashik Crime : कॉफी शॉपच्या नावाखाली युवक- युवतींना अश्लील चाळे करण्यासाठी छोटेखाणी केबिन उपलब्ध करणारे चार कॅफे इंदिरानगर पोलिसांनी मंगळवारी (ता. १७) उद्‌ध्वस्त केले.

वडाळा- पाथर्डी रस्त्यावर असलेल्या काही कॉफी शॉपमध्ये पडद्यांचा आडोसा घालून छोटेखाने केबिन तयार करून युवक- युवतींना पुरवण्यात येते होते. (Indiranagar police action on coffee shop nashik crime news)

गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक एस. बी. सोनवणे योगेश जाधव, शामल जोशी आदींनी वरिष्ठ निरीक्षक नितीन पगार यांच्याशी चर्चा करून बापू बंगला भागातील पद्मा बिल्डिंगमधील ब्लॅक मून कॅफे, सराफ लॉन्सजवळील सेव्हन स्टार बिल्डिंगमधील टोकियो कॅफे, सराफनगरच्या दक्ष इम्पेरिया इमारतीमधील दोन ठिकाणी आलेल्या ब्लॅक स्पून कॅफेंवर धाड टाकली.

A cabin built into a coffee shop
Nashik Crime: शहरात मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्रीचा प्रकार उघडकीस

त्यात खालच्या बाजूला नियमाप्रमाणे कॉफी शॉप आढळून आले. मात्र त्यातच पार्टिशन करून वरच्या जिन्याने वरच्या बाजूला पडदे टाकून छोटे केबिन केलेल्या आढळून आल्या.

त्यात एक टेबल आणि दोन खुर्ची असे साहित्य मिळून आले. केबिनमध्ये अल्पवयीन युवक आणि युवती अश्लील चाळे करताना पोलिसांना आढळून आले. त्या सर्वांना कडक समज देऊन सोडण्यात आले. मात्र चारही कॅफे चालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

A cabin built into a coffee shop
Nashik Fraud Crime: ऑनलाइन सातबारा उताऱ्यामुळे भामट्याचा भांडाफोड; संशयिताकडे बनावट शेतकऱ्याचा पुरावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()