नाशिक : माणूस गावातच सुखाने जगेल, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न होते. शिवरायांचे आदर्श विचार मनापासून आत्मसात केल्यास समाजात एकाही स्त्रीवर अत्याचार होणार नाहीत, असे प्रतिपादन निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी केले. ते सटाणा येथील पाठक मैदानावर शिवसाम्राज्य प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कीर्तनात ते बोलत होते.
इंदुरीकर महाराज : चांगल्या मित्रांची संगत आयुष्याला योग्य वळण देते
इंदुरीकर महाराज म्हणाले, की जी माणसे मोठ्याने हसतात, ती निर्मळ असतात. गालात हसतात ती गद्दार असतात. मोठ्याने बोलतात ती आतून व बाहेरून निर्मळ असतात. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा. चांगल्या मित्रांची संगत ही आयुष्याला योग्य वळण देते. सुटीत मिळेल ते काम करून स्वत:ला गुंतवून ठेवा. कोणत्याही संकटाचा सामना करण्याची ताकद फक्त शेतकऱ्याकडेच आहे. अपयश पचविणारा नेहमी यशस्वी होतो. स्वतःमध्ये असलेले स्किल समाजाला दाखवून यशस्वी व्हा, हीच खरी शिवजयंती आहे. मेल्यानंतर माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही. त्यामुळे हसत यावे आणि हसत जावे.
हजारोंच्या गर्दीने खच्चून भरले मैदान
इंदुरीकर महाराजांचे रात्री उशिरा साडेनऊला शहरात आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करून घोषणाही देण्यात आल्या. महाराजांच्या समर्थनार्थ पाठक मैदानावर शहर व तालुक्यातील हजारो पुरुष व महिला भाविक रात्री उशिरापर्यंत उपस्थित होते. इतिहासात पहिल्यांदाच पाठक मैदान रात्री उशिरापर्यंत हजारोंच्या गर्दीने खच्चून भरले होते
हिंगणघाट येथील पीडित युवतीला श्रद्धांजली
मेशी (ता. देवळा) येथील अपघातातील मृत व हिंगणघाट येथील पीडित युवतीला श्रद्धांजली वाहण्यात आली. इंदुरीकर महाराज व इतरांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
दरम्यान, मोफत आरोग्य तपासणी शिबिरात शेकडो रुग्णांनी तपासण्या केल्या. पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. प्रतिष्ठानचे गणेश नंदाळे, अक्षय सोनवणे, सुमंत अहिरे, निकितेश सोनवणे, चेतन सोनवणे, सूरज सोनवणे, रोनीत येवला, सागर गोसावी, अक्षय मोराणकर, सुदर्शन गोसावी, शुभम अहिरे, शेखर सोनवणे, योगीराज खैरनार, कल्पेश अहिरे, राहुल भावसार, केतन बच्छाव, यश बच्छाव, यश सोनवणे, अविनाश शिंदे, रज्जू सोनवणे आदी उपस्थित होते.
तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक निरीक्षक देवेंद्र शिंदे, उपनगराध्यक्ष सोनाली बैताडे, नगरसेवक राहुल पाटील, दिनकर सोनवणे, नितीन सोनवणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण सोनवणे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.