Nashik Uday Samant News : उद्योगांसाठी 850 हेक्टर जमिनीचे संपादन सुरू : उद्योगमंत्री सामंत

Increased time for offline exams uday samant nashik
Increased time for offline exams uday samant nashikesakal
Updated on

Nashik Uday Samant News : नाशिकमध्ये विविध उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीचा वाढता प्रतिसाद पाहता आगामी काळात नाशिक जिल्ह्यातील पाच ठिकाणी सुमारे साडेआठशे हेक्टर जमीन उद्योगासाठी संपादनाची प्रक्रिया सुरू केली असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

श्री. सामंत आज येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत संघटनांच्या पदाधिकारींकडून माहिती जाणून घेतली. (Industries Minister Samant statement Acquisition of 850 hectares of land for industries started nashik news )

जिल्ह्यातील कृषी प्रक्रिया, वाइन, पैठणी, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीकलसह विविध क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत सकारात्मक प्रतिसाद पाहता नाशिकमधील सिन्नर, मापारवाडी, राजूर बहुला, घोटी, वाडीवऱ्हे, जांबुटके, मनमाड आदी ठिकाणी औद्योगिक वसाहती स्थापण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त जमीन एमआयडीसीच्या ताब्यात आली आहे. उर्वरित भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

नाशिकला औद्योगिक प्रदर्शन सेंटर उभारण्याबाबत त्र्यंबक रोडवरील खादी ग्रामोद्योग केंद्रातील ५० हेक्टर जमिनीबाबत खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्रीही यात लक्ष घालत आहेत.

नाशिकमध्ये आयटी पार्कबाबत या पूर्वीच जागा उपलब्ध करून दिली होती, पण त्यावेळी आयटी कंपन्यांनी पुण्यामध्येच राहणे पसंत केले, पण नंतरच्या काळात नाशिकमध्ये अनेक आयटी कंपन्यांनी काम सुरू केले. त्यांच्या मागण्याचा विचार करून जागा उपलब्ध करून देत आहोत असेही सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Increased time for offline exams uday samant nashik
Uday Samant : 'आम्हाला गद्दार-खोकेबहाद्दर म्हणाले, आता हिम्मत असेल तर अजितदादांवर टीका करून दाखवा'

समिती अहवालानंतर निर्णय

पांजरापोळबाबत समितीचा अहवालात प्राप्त झाला आहे यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. आक्राळे एमआयडीसीत लवकरच उर्वरित भूखंडांच्या वाटपाबाबत प्रक्रिया सुरू करणार असल्याचेही मंत्री सांवत म्हणाले.

असे होणार भूसंपादन

राजूर बहुला ः १४४ हेक्टर

मापारवाडी ः २३० हेक्टर

जांबुटके ः ३० हेक्टर

घोटी इगतपुरी ः २६७ हेक्टर

मनमाड ः २०० हेक्टर

३० हजार नवउद्योजक होणार

तीन वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात फक्त तीन हजार नवउद्योजक तयार झाले होते. त्याच्या दुसऱ्या वर्षात पाच हजार तर आम्ही सत्तेवर आल्यावर मात्र १३ हजार नवउद्योजक तयार झाले आले आहेत. येणाऱ्या काळात तीस हजार नविन उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही मंत्री सावंत यांनी सांगितले.

Increased time for offline exams uday samant nashik
Uday Samant : 'आम्हाला गद्दार-खोकेबहाद्दर म्हणाले, आता हिम्मत असेल तर अजितदादांवर टीका करून दाखवा'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.