उद्योगांच्या लॉकडाउनमुळे रूतलेल्या चाकांना गती

Automobile Sector
Automobile SectorSakal
Updated on
Summary

लॉकडाउनमुळे (lockdown) ठप्प झालेले उद्योग चक्र सोमवार (ता.२४) पासून सुरू झाले. कामगारांची व्यवस्था करू न शकलेल्या मोठ्या कंपन्यांतही उत्पादनाला सुरवात झाल्यामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे.

सातपूर (नाशिक) : लॉकडाउनमुळे (lockdown) ठप्प झालेले उद्योग चक्र सोमवार (ता.२४) पासून सुरू झाले. कामगारांची व्यवस्था करू न शकलेल्या मोठ्या कंपन्यांतही उत्पादनाला सुरवात झाल्यामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारपासून निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. (industries that were shut down due to the lockdown have resumed in nashik)

लॉकडाउनमध्ये कंपनी आवारात किंवा दोन किलोमीटरच्या परिसरात कामगारांची व्यवस्था करणाऱ्या कंपन्याच सुरू ठेवण्यास परवानगी होती. अवघ्या एक - दोन टक्के कंपन्यांनाच, अशी व्यवस्था करता आली. उत्पादन बंद असल्यामुळे रोज कोट्यवधींचे नुकसान होत असल्यामुळे काही मोठ्या कंपन्यांनी सातपूर परिसरातील हॉटेल्स, मंगल कार्यालयांमध्ये कामगारांची निवास व भोजनाची व्यवस्था करीत किमान क्षमतेवर उत्पादनाची एक लाइन सुरू ठेवली होती. या कंपन्यांना उत्पादन सुरू करता आले असले तरी कोरोना होऊ नये, याची खबरदारी घेऊन किमान कामगारांमध्ये कंपनी सुरू ठेवावी लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार सर्व कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना फोटोसह ओळखपत्र तातडीने तयार करून द्यावे. प्रवास करताना संबंधित कर्मचाऱ्याकडे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. आस्थापनेत प्रवेश करणाऱ्या सर्वांची आरटी-पीसीआर अथवा आरएटी चाचणी १५ दिवसांच्या आत करावी. ओळखपत्र व चाचण्यांबाबत कार्यवाही सुरू केल्याचा अहवाल एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना तत्काळ सादर करावा, लसीकरणाच्या उपलब्धतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे, कामगारांना कोरोना संसर्ग होऊ नये यासाठीच्या सर्व उपाययोजना राबविणेही उद्योगांवर बंधनकारक आहे.

Automobile Sector
नाशिक जिल्ह्यात आजपासून कांदा लिलाव

कोरोनाचे सर्व नियम पाळून औद्योगिक क्षेत्र सुरू झाले आहेत. लवकरच या संकटातून उद्योग बाहेर पडून अधिक जोमाने उत्पादन सुरू करण्यासाठी एमआयडीसी प्रयत्नशील आहे.

नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी.

(industries that were shut down due to the lockdown have resumed in nashik)

Automobile Sector
नाशिक जिल्‍ह्यात आज 677 पॉझिटिव्‍ह, 1 हजार 349 कोरोनामुक्‍त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.